शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

आरोग्य सुविधा वाढवायच्या तेव्हा आम्ही टाळ्या वाजवत राहिलो; अर्थमंत्र्यांच्या पतीकडूनच 'घरचा' आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 11:02 AM

finance minister nirmala sitharaman husband slams modi government: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांच्याकडून मोदी सरकारच्या कामाचे वाभाडे

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात साडे तीन लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पत्नी आणि अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनीदेखील सरकारला लक्ष्य केलं आहे. कोरोना संकटात वंचितांना मदत करण्याऐवजी सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त होतं, अशी टीका प्रभाकर यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या एका कार्यक्रमात केली.कोरोना लस 'देत नाही जा' म्हणणाऱ्या अमेरिकेशी अजित डोवाल थेट बोलले, अन्...स्वत:ला अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणं टाळण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोरोना लसीकणाबद्दल सरकारला काही सल्ले दिले. त्यावर केंद्रातील एका मंत्र्यानं अतिशय वाईट प्रतिक्रिया दिली. त्यांना या विषयाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, अशी टीका प्रभाकर यांनी केली आहे. गेल्या वर्षीदेखील प्रभाकर चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी एका लेखाच्या माध्यमातून सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीकेची झोड उठवली होती.मायदेशावर कोरोना संकट! हृदय तुटले, दोन जगज्जेत्या कंपन्यांचे सीईओ मदतीला धावलेलॉकडाऊन म्हणजे समस्येवरील उत्तर नव्हेलॉकडाऊन हा कोरोना संकटावरचा उपाय नाही, लसीकरण हाच कोरोना संक्रमण रोखण्याचा उपाय आहे. लॉकडाऊनच्या वेळेचा वापर आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी व्हायला हवा होता. पण त्यावेळी आपण दिवे पेटवत राहिलो, टाळ्या-थाळ्या वाजवत राहिलो, अशा शब्दांत प्रभाकर यांनी मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून वंचित वर्गाला मदत करण्याऐवजी सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्यात व्यस्त होतं. स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल झाले. त्यातून सरकारचा निष्ठुरपणा दिसून आला, अशा कडक शब्दांत प्रभाकर यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदी