नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत बजेट सादर करत आहेत. यावेळी त्यांनी देशाचं वर्णन करताना काश्मीरचा खास उल्लेख केला. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी एका कवितेचा आधार घेतला. काश्मिरी कवी पंडित दिनानाथ यांची कविता वाचून दाखवत सीतारामन यांनी देशाचं महात्म्य अधोरेखित केलं. त्यांनी या कवितेचा हिंदी आणि इंग्रजीतला अनुवाददेखील वाचून दाखवला.निर्मला सीतारामन यांनी वाचून दाखवलेल्या कवी पंडित दिनानाथ यांच्या कवितेतल्या ओळी- हमारा वतन खिलते हुए सालीमार बाग जैसे, हमारा वतन डल में खिलते हुए कमल जैसा, नवजवनों के गर्म खून जैसा, मेरा वतन तेरा वतन, हमारा वतन, दुनिया का सबसे प्यारा वतन
Budget 2020: बजेटमध्ये काश्मिरी रंग; निर्मला सीतारामन यांनी वाचली खास कविता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 12:08 PM