नवी दिल्लीः नोटाबंदीनंतर अनेकांना पैशांचा तुटवडा जाणवला होता. त्यानंतर मोदी सरकारनं पुन्हा 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा बाजारात उपलब्ध करून दिल्या. आता त्यातील 2000च्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. बँकांना एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा न टाकण्याची सूचना करण्याच्या वृत्तावर वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनीसुद्धा सूचक विधान केलं आहे. बँकांना अशा प्रकारची कोणतीही सूचना देण्यात आलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बँका एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून त्यांच्या जागी 500 रुपयांच्या नोटा टाकत असल्याची माहिती समोर आली होती. बिजनेस स्टँडर्डनं याची माहिती दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. 2000च्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. देशातील जवळपास 2 लाख 40 हजार एटीएममध्ये 2000च्या जागी 500 नोटा टाकण्याचा हा बदल करावा लागणार आहे.
2000 रुपयांच्या नोटा बंद होणार?; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 9:27 PM
बँकांना एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा न टाकण्याची सूचना करण्याच्या वृत्तावर वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनीसुद्धा सूचक विधान केलं आहे.
ठळक मुद्दे बँकांना एटीएममध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा न टाकण्याची सूचना करण्याच्या वृत्तावर वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनीसुद्धा सूचक विधान केलं आहे.बँका एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून त्यांच्या जागी 500 रुपयांच्या नोटा टाकत असल्याची माहिती समोर आली होती.बँकांना अशा प्रकारची कोणतीही सूचना देण्यात आलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.