नवी दिल्ली - बॉलिवुड दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाने केलेल्या कारवाईवरून देशभरात राजकारण सुरू आहे. काही लोक ही कारवाई योग्य असल्याचे म्हणत आहेत, तर काहींनी ही कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman) यांना विचारण्यात आले, तेव्हा त्या म्हणाल्या, आमचे सरकार असताना जेव्हा अशा प्रकारची कारवाई होते, तेव्हा त्यावर प्रश्न उपस्थित केले जाते. मात्र, 2013 मध्ये जेव्हा कलाकार मंडळींवर कारवाई झाली, तेव्हा कुणीही प्रश्न उपस्थित केला नव्हता. (Finance minister Nirmala sitharaman says about it action against anurag kashyap taapsee pannu)
तापसी-अनुरागनंतर तपासाची व्याप्ती आणखी वाढली, रिलायन्स एंटरटेनमेन्टसह 4 कंपन्यांवर ITच्या धाडी
निर्मला सीतारमण म्हणाल्या, ''मी कुठल्याही प्रकरणाचा उल्लेख करणार नाही आणि कुणाचे नावही घेणार नाही. मात्र, आमच्या सरकारच्या काळात अशा प्रकारची कारवाई होते, तेव्हा प्रश्न उपस्थित होतात. मात्र, 2013 मध्ये या लोकांवर कारवाई झाली होती. तेव्हा कुणीही कुठल्याही प्रकारचा प्रश्न उपस्थित केला नाही.''
सीतारण म्हणाल्या, ''हे दुटप्पी धोरण नाही? जे होत आहे, ते बरोबर आहे, की चूक याचा विचार आपण मुळापर्यंत जाऊन करायला नको? की, आमच्या सरकारने छापेमारी केली आहे. त्यामुळे फक्त प्रश्नच उपस्थित करायचे?''
बुधवारी झाली होती छापेमारी -आयकर विभागाने बुधवारी टॅक्स चोरीप्रकरणात निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूसह अनेक बॉलीवुड कलाकारांच्या घरावर छापे टाकले. यादरम्यान अनुराग कश्यप आणि तापसी यांची पुण्यात चौकशीही झाली होती.
"…त्याचीच किंमत तापसी आणि अनुरागला चुकवावी लागतेय", सामनातून मोदी सरकारवर निशाणा
याप्रकरणावरून राजकारणही सुरू झाले आहे, या कारवाईवरून काँग्रेस आणि एनसीपीने केंद्र सरकारवर बदला घेत असल्याचा आरोप केला. तर आयकर विभागाने कायद्याच्या चौकटीतच कारवाई केली असल्याचे सरकारने म्हटले आहे.
350 कोटी रुपयांच्या कर चोरीची शंका -आयकर विभागाच्या माहितीनुसार दोन मोठ्या फिल्म प्रोडक्शन, अभिनेत्री तापसी पन्नू आणि दोन व्यवस्थापन कंपन्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. छापेमारीत मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद येथील घर आणि कार्यालयांचा समावेश होता. एकूण मिळून तब्बल 28 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यात मिळकत (income) आणि शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर झाल्याचे पुरावे आयकर विभागाच्या हाती लागले आहेत. आयकर विभागाला या प्रकरणात एकूण मिळून 350 कोटी रुपयांच्या कर चोरीची शंका आहे.
बापरे! ३५० कोटींची अफरातफर; तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप प्रकरणात मोठे पुरावे हाती!असं आहे प्रकरण -2011 मध्ये अनुराग कश्यप, मधू मनटेना, विक्रमादित्य मोटवाने आणि विकास बहल यांनी फॅम्टम फिल्म्सची स्थापना केली होती. मात्र, ऑक्टोबर 2018 मध्ये ही कंपनी बंद करण्यात आली होती. सूत्रांचे म्हणणे आहे, की कपंनी आणि यांच्यावतीने फाईल केलेले रिटर्न जुळत नाहीत. हा थेट टॅक्सचोरीचाच संकेत आहे.