नवी दिल्ली. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज पत्रकार परिषद घेऊन इतर घोषणा करणार आहेत. अर्थमंत्री आज कृषी क्षेत्र आणि त्यासंबंधित कामांची घोषणा करू शकतात. बुधवारी अर्थमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बळकटी देण्यासाठी सुमारे 6 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार आणि विकासकांना नुकसानभरपाईशिवाय सहा महिन्यांचा अतिरिक्त कालावधी देण्यासारख्या काल घोषणा करण्यात आल्या होत्या. टीडीएस आणि टीसीएसमध्ये त्रैमासिक कपात, आयकर विवरणपत्र सादर करणे आणि एमएसएमईची व्याख्या बदलण्यासारखे मोठे निर्णय घेतले होते. आता दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकर्यांसाठी काय असू शकते विशेष पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या मुदतवाढीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासंबंधीही घोषणा होऊ शकते. मागील 6 वर्षात झालेल्या सुधारणांमुळे आज भारताची अर्थव्यवस्था अधिक कार्यक्षम व सामर्थ्यवान झाली आहे. सुधारणांची व्याप्ती नवीन उंची गाठत आहे. या सुधारणा शेतीशीदेखील जोडल्या जाऊ शकतात. जेणेकरून शेतकऱ्या सक्षम बनवता येईल. भविष्यात कोरोना संकटासारख्या इतर कोणत्याही आपत्तीत शेतीच्या कामकाजावर कशा पद्धतीनं कमी परिणाम होईल, याचं नियोजनही केलं जाण्याची शक्यता आहे. काळाची गरज ओळखून मोदी सरकारनं हे मोठं पॅकेज दिलं असून, आता शेतकऱ्यांसाठीही या आर्थिक पॅकेजमध्ये अनेक तरतुदी असू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी तिच्या पहिल्या टप्प्यात तपशील दिला. यामध्ये छोट्या उद्योगात काम करणा-यांना दिलासा मिळाला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
52 दिवसांपासून ड्युटीवरच नर्स; अचानक मुलीचा व्हिडीओ कॉल आला अन् अश्रूंचा बांध फुटला
CoronaVirus News : पायी बिहारला जाणाऱ्या मजुरांना भरधाव रोडवेज बसने चिरडले, 6 जणांचा मृत्यू
विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर