शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
2
मुहूर्त ठरला! अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागणार; माजी महापौरांसह नगरसेवकांच्या हाती लवकरच तुतारी 
3
"राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून मला केवळ देवच बाहेर करू शकतो", जो बायडन यांनी ठणकावले  
4
Budget 2024: अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी मोठी गिफ्ट देणार का सरकार? 'या' ३ घोषणा होण्याची शक्यता
5
इराणमध्ये सत्तांतर! सुप्रिम लीडर खामेनेईंचा उमेदवार पडला; मसूद पेझेश्कियान नवे राष्ट्रपती
6
"सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची गरज काय?"; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांचा सवाल
7
आजपासून सुरू होणारे नीटचे कौन्सिलिंगची स्थगित; नवीन तारखा लवकरच जाहीर होणार
8
काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार
9
मुलीसुद्धा डेटवर जातात, मग एकट्या मुलावर कारवाई कशासाठी? कोर्टाने उपस्थित केला सवाल
10
Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ! तपासा तुमच्या शहरातील दर
11
भारतात २० ऑटो कंपन्या, कित्येकांचे तर नावालाच अस्तित्व...; जूनमध्ये कोणी किती कार विकल्या?
12
BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार
13
मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे
14
पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; बाईक अडवल्याचा होता राग
15
"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"; वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर काँग्रेस म्हणतं, "उमेदवार झाले तेव्हाच..."
16
आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
17
दर महिन्याला EMI भरावा लागत नाही असं लोन माहितीये का? इमर्जन्सीमध्ये येऊ शकतं कामी
18
"BMCने गैरसमजातून तक्रार केली होती"; शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट
19
अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत रणवीर थिरकला 'इश्क दी गली' गाण्यावर, तर सलमानचाही डान्स व्हायरल
20
शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी सांगलीचा जयंत पॅटर्न राज्यात राबवणार; अजित पवारांची विधानसभेत घोषणा

जीएसटी खटल्यात अधिकाऱ्यांच्या अपिलांसाठी आर्थिक मर्यादा निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 6:57 AM

सरकारी खटले कमी व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: वस्तू व सेवा करांशी (जीएसटी) संबंधित खटल्यांत कर अधिकाऱ्यांना अपील दाखल करण्यासाठी आर्थिक मर्यादा निश्चित करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. सरकारी खटले कमी व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी ५३ व्या जीएसटी परिषद बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. 

त्यांनी सांगितले की, जीएसटी अपील लवादाकडे अपील करण्यासाठी २० लाख रुपये, उच्च न्यायालयात अपिलासाठी १ कोटी रुपये आणि सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी २ कोटी रुपये मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. विवादातील रक्कम या मर्यादेपेक्षा कमी असेल, तर प्राधिकरण अपील दाखल करणार नाही. 

सीतारामन यांनी सांगितले की, अपील प्राधिकरणासमोर अपील दाखल करण्यासाठी कमाल पूर्व ठेव रक्कम सीजीएसटी आणि एसजीएसटीसाठी २५ कोटी रुपयांवरून घटवून २० कोटी रुपये करण्याची शिफारसही जीएसटी परिषदेने केली आहे.सीतारामन यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट, विश्राम कक्ष आणि प्रतीक्षागृह यासारख्या सुविधा जीएसटी मुक्त आहेत. शिक्षण संस्थांच्या बाहेर वसतिगृहातील सेवांसाठी दरमहा २० हजार रुपये प्रतिव्यक्ती सूट देण्यात आली आहे. ही सवलत विद्यार्थी तथा कामकरी वर्गासाठी असून, किमान ९० दिवस राहिल्यानंतर तिचा लाभ घेता येऊ शकेल.

पॅकिंग बॉक्सेसवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के विविध वस्तूंच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या कार्टन बॉक्सेसवरील सेवा कर १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्याची शिफारस जीएसटी परिषदेत करण्यात आली आहे. सफरचंदांच्या पॅकिंगसाठी या बॉक्सेसचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्यावरील जीएसटी कमी करण्याची मागणी हिमाचल प्रदेशकडून सातत्याने केली जात होती.

टॅग्स :GSTजीएसटीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन