नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या कंपन्यांशी संबंधित असलेल्या तीन जणांच्या दिल्ली-एनसीआर आणि बंगळुरूतील ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दुपारी झडती घेतली. संरक्षण साहित्याच्या खरेदीत काही संशयिताना दलाली मिळाल्याबाबत ही झडती घेतली गेली. ही कारवाई विदेशात जमवलेल्या संपत्तीशी संबंधित प्रकरणीही होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. वड्रा यांच्या कंपन्यांशी संबंधित दोन कर्मचाºयांची आणि दुसºया एकाच्या ठिकाणी ही झडती झाली.>प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्नही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून, सर्व सरकारी यंत्रणा माझी प्रतिमा मलिन करीत आहे, असा आरोप वड्रा यांनी केला. वड्रा यांच्या वकिलाने माध्यमांशी बोलताना कर्मचाºयांना कार्यालयात बंद केल्याचा आरोप केला आहे.
रॉबर्ट वड्राशी संबंधित तिघांच्या ठिकाणांची ईडीकडून झडती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 4:29 AM