शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

खडकाळी सिग्नलला कचर्‍याचा विळखा

By admin | Published: October 06, 2016 10:23 PM

नाशिक : शालिमार ते गंजमाळ दरम्यान असणार्‍या खडकाळी सिग्नलला कचर्‍याने वेढले असून, या ठिकाणी मुक्या जनावरांचाही सतत वावर असल्याने अस्वच्छतेत वाढ होत असून, तातडीने हा कचरा हटविण्याची मागणी होत आहे.

नाशिक : शालिमार ते गंजमाळ दरम्यान असणार्‍या खडकाळी सिग्नलला कचर्‍याने वेढले असून, या ठिकाणी मुक्या जनावरांचाही सतत वावर असल्याने अस्वच्छतेत वाढ होत असून, तातडीने हा कचरा हटविण्याची मागणी होत आहे.अनेक भाजीबाजारांना अतिक्रमणांचा विळखानाशिक : शहरातील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची एकाच वेळी गर्दी होत असून, नागरिकांनी आणलेल्या वाहनांमुळे भाजीबाजार परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. तातडीने वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.नियोजित थांब्यावर बस थांबत नसल्याची तक्रारनाशिक : जुने सिडको परिसरातील स्टेट बँक चौक या बसथांब्यावर अंबडच्या दिशेने जाणार्‍या बसेस महामार्गावरून न जाता लेखानगर मार्गे जाव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तसेच नियोजित थांब्यावर या थांबवाव्यात, अशी मागणी होत आहे.गॅस वितरकांकडून ग्राहकांची फसवणूकनाशिक : शहरातील गॅस एजन्सीज ग्राहकांकडून नियमापेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात आहे. एजन्सी देत असलेल्या पावतीवरील रकमेपेक्षा २० ते ३० रुपये जादा आकारले जात असल्याची ग्राहकांची तक्रार आहे.आदर्शनगर भागात ठेल्यांचे अतिक्रमणनाशिक : पवननगर भागातील आदर्शनगर परिसरात भेळ विक्रेत्यांचे ठेले आणि व्यावसायिकांच्या संख्येत वाढ होत असून, सायंकाळी या भागातून जाताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या व्यावसायिकांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.पाथर्डी फाटा येथे अवैध भाजीबाजार स्थापननाशिक : मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या पाथर्डी फाटा परिसरात भाजी विक्रे त्यांनी बेकायदेशीररीत्या व्यवसाय सुरू केल्याने या परिसरात वाहतूक कोंडीसह अस्वच्छतेची समस्यादेखील उद्भवत आहे.मॉडेल कॉलनी परिसरात पथदीप बंदनाशिक : गेल्या काही दिवसांपासून कॉलेजरोड भागातील मॉडेल कॉलनी परिसरातील पथदीप बंद असल्याने परिसरात टवाळखोरांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरातील लोकप्रतिनिधी विकासकामे राबविण्यात असमर्थ ठरल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.गंजमाळ परिसरात भंगार बाजाराचे वाढते साम्राज्यनाशिक : खडकाळी सिग्नल ते द्वारकाकडे जाणार्‍या मार्गावर भंगार बाजाराचे अतिक्रमण वाढले असून, भंगार व्यावसायिकांची दुकाने रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.लेखानगर परिसरात ट्रक थांब्यामुळे अडसरनाशिक : सिडको लेखानगर परिसरात मुंबई-आग्रा महामार्ग उड्डाणपुलाखाली अवजड वाहतूक करणारी वाहने तसेच ट्रक उभ्या राहत असल्याने वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध होत नाही. वाहतूक प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.आश्विननगर परिसरात रोडरोमिओंचा उच्छादनाशिक : आश्विननगर येथील राजे संभाजी स्टेडिअम परिसरात रात्री अंधाराचा फायदा घेत सिगारेट, मद्य प्राशन करून धिंगाणा घालत असल्याचे बघायला मिळते. येथून अंबड पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनही पोलिसांचा धाक उरला नसल्याचे जाणवते.