नाशिक : राज्यातील कुठल्याही जिल्ह्याचे तुम्ही मतदार असले तरी सहज घरबसल्या तुमच्या अॅन्ड्रॉइड भ्रमणध्वनीवरून आपल्या जिल्ह्याच्या मतदारयादीमध्ये संपूर्ण कु टुंबाचे ‘स्थान’ जाणून घेता येणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या नाशिककर तरुणाने ‘वोटर लिस्ट इन मराठी’ नावाचे अॅप विकसित केले आहे. हे अॅप्लिकेशन पूर्णपणे मोफत डाउनलोड करता येते.राज्यातील सध्या दहा महानगरपालिका निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. निवडणुका आल्या की मतदारयादीत आपले नाव शोधणे हे मतदारांपुढे मोठे आव्हान असते. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या विविध राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडे असलेल्या याद्या धुंडाळून नावे शोधत त्यांची चिठ्ठी (स्लीप) घेऊन यायची ही पारंपरिक पद्धत. मात्र आता हा खटाटोप करण्याची मतदारांना गरज नाही. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात नाशिकच्या कर्णनगर परिसरात राहणारा तरुण कौस्तुभ भडमुखे याने आपल्या ज्ञानाचा फायदा जनतेला व्हावा या उद्देशाने मराठी भाषेमधून ‘अॅप’ विकसित केले आहे. हे अॅप गुगल प्ले-स्टोअरवरून सहजरीत्या मोफत डाउनलोड करता येते. या अॅप्लिकेशनचे वैशिष्ट म्हणजे राज्यातील कुठल्याही जिल्ह्यामधील मतदार आपले नाव सहज शोधू शकतो. यासाठी त्याला मतदान कार्डावरील क्रमांक लिहून स्वत:चे व कुटुंबातील सदस्यांची नावे मिळू शकतात. नावांबरोबर यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक, मतदान केंद्राची माहिती मिळते. हे अॅप्लिकेशन पूर्णपणे मोफत आहे.अॅप्लिकेशन हाताळण्यासाठी अत्यंत सुटसुटीत असल्यामुळे ते कोणालाही सहजरीत्या सुलभ वापरता येऊ शकते. या अॅप्लिकेशनवरून मिळालेली यादी भाग क्रमांक व त्यामधील अनुक्रमांक आणि मतदान केंद्र क्रमांकावरून त्या केंद्रावर जाऊन संबंधित कें द्र अधिकाऱ्याला ओळखीचा पुरावा व सदर माहिती दाखवून मतदान करता येणार आहे.
घरबसल्या शोधा मतदारयादीत आपले ‘स्थान’
By admin | Published: February 09, 2017 3:35 PM