शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Coronil : कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 12:46 PM

पतंजलीचे बाबा रामदेव यांनी कोरोनावर 100 टक्के मात करणारे कोरोनिल औषध लाँच केले होते. यावरून वाद निर्माण झाल्याने आयुष मंत्रालयाने या दिव्य कोरोना किटच्या जाहिरातीवर बंदी आणली होती.

नवी दिल्ली - पतंजली योगपीठाचे प्रमुख योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनिल हे कोरोनावरील औषध जगासमोर आणलं. तसेच माझ्याकडे कोरोना बरा करण्याचा उपाय आहे. माझ्याकडे असलेलं औषध 100 टक्के गुणकारी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र आता कुठल्याही प्रमाणित वैद्यकीय संस्थेची मान्यता तसेच शासकीय परवानगी न घेता हे औषध तयार करून प्रसिद्धीस आणल्याने कोरोनिल हे औषध वादाचा भोवऱ्यात सापडले आहे. आयुष मंत्रालयाने या औषधाच्या जाहिरातीवर बंदी आणलेली असतानाच आता बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. 

बाबा रामदेव यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. जयपूरमध्ये कोरोनिल या औषधावरुन आता बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य तिघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कोरोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण कोरोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. जयपूरच्या ज्योति नगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात कोरोनिल औषधावरुन दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पतंजलीचे बाबा रामदेव यांनी कोरोनावर 100 टक्के मात करणारे कोरोनिल औषध लाँच केले होते. यावरून वाद निर्माण झाल्याने आयुष मंत्रालयाने या दिव्य कोरोना किटच्या जाहिरातीवर बंदी आणली होती. तर राजस्थान सरकारने यापुढचे पाऊल उचलताना गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महाराष्ट्र सरकारचे मंत्री अजित पवार यांनी ज्यांचा विश्वास असेल त्यांनी मागवावे अशी भूमिका जाहीर केली होती. याबाबत महाराष्ट्रातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

य़ोगगुरु रामदेव बाबांच्या या कोरोनिल औषधावरून आता राज्यांनी सक्त पाऊले उचलली आहेत. महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सरकारची भूमिका मांडली आहे. ट्विट करून महाराष्ट्र सरकारचा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायलबाबत काही माहिती उपलब्ध नाही. जयपूरची एनआयएमएस संस्था याचा तपास करत आहे. यामुळे अशा धोकादायक औषधाला महाराष्ट्र सरकार कधीही परवानगी देणार नाही. यामुळे महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात येत आहे, असे देशमुख यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : आजारी आहात?, चिंता विसरा आता घरबसल्या मोफत चेकअप करा

घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड, नोंदवा कुटुंबातील सदस्याचं 'नाव'; जाणून घ्या कसं

CoronaVirus News : "कोरोनावर लस विकसित झाली तरी..."; बिल गेट्स यांचं चिंताजनक वक्तव्य

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात प्लाझ्मा थेरपी किती प्रभावी?, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

"सत्तेच्या हव्यासापोटी देशात लागू केली आणीबाणी, एका रात्रीत संपूर्ण देशाचा केला तुरुंग"

CoronaVirus News : 7 दिवसांत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 कोटीवर?, WHO ने दिला गंभीर इशारा

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाcorona virusकोरोना वायरस बातम्याpatanjaliपतंजलीPoliceपोलिसRajasthanराजस्थान