ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 10- एका ऑटो शोमध्ये सोन्यापासून बनवलेली गॉडझिला कार ठेवण्यात आली आहे. ही कार अनेकांच्या आश्चर्याचा विषय ठरते आहे. या कारची 10 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 6 कोटी 65 लाख 77 हजार 450 इतकी किंमत आहे. ही कार कुव्हर रेसिंग या ऑटोमोबाईल कंपनीनं सादर केली आहे.
निसान आर 35 जीटी-आर या रेसिंग कारला सोन्यानं मढवून ही कार बनवण्यात आली आहे. इतरही अनेक कंपन्यांनी या प्रकल्पात सहभाग नोंदवला आहे. या कारचे कव्हर स्पेशल गोल्ड पेंटनं रंगवण्यात आलं आहे. या कारमध्ये 545 एचपी पॉवरचं टर्बो इंजिन बसवण्यात असून, हॉर्सपॉवरही दिली आहे. कारमध्ये वायुगतीच्या वेगानुरुप तंत्रज्ञान बसवण्यात आलं आहे.
कारची बॉडी एकदम मजबूत आहे. ही गाडी ओलसर जागेवरून अगदी न घसरता जलदरीत्या जाऊ शकते, अशी यंत्रणा बसवण्यात आली आहे. कारमध्ये सम आणि विषम अशा रितीनं गेअर बसवण्यात आले असून, सर्वात वरचा आणि खालचा गेअर पटकन बदलावा लागतो. या कारमध्ये हायपॉवरवालं ऑइल वापरण्यात येतं. ऑटोमेकेनिका दुबई 2016 च्या प्रदर्शनात ही कार ठेवण्यात आली आहे.