आगीत ५० हजारांचा चारा जळून खाक
By admin | Published: May 16, 2016 12:44 AM
जळगाव : आसोदा शिवारातील एका शेतात आग लागून जनावरांचा ५० हजार रुपयांचा चारा जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव : आसोदा शिवारातील एका शेतात आग लागून जनावरांचा ५० हजार रुपयांचा चारा जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.आसोदा येथील रहिवासी राजेश रमेश पाटील यांचे आसोदा शिवारातील गट क्रमांक ४७२/१ मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी जनावरांसाठी लागणारा मक्याचा चारा ठेवलेला होता. या चार्यास १५ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला. या घटनेत राजेश पाटील यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन दुष्काळात त्यांच्यावर संकट ओढावले आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. आग लागली की कोणी लावली? याबाबत साशंकता आहे. याप्रकरणी पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली. चौकशी हेड कॉन्स्टेबल नामदेव सोनवणे करीत आहेत.