Bhandara Fire : "भंडाऱ्यातील घटना अत्यंत वेदनादायी"; राहुल गांधींनी केलं महाराष्ट्र सरकारला "हे" आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2021 01:32 PM2021-01-09T13:32:11+5:302021-01-09T14:06:12+5:30
Rahul Gandhi And Bhandara Fire : भंडाऱ्यातील घटनेवर राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
नवी दिल्ली - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही आग लागली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.
भंडाऱ्यातील या घटनेवर राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच मृत बाळांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करा असं आवाहन सरकारला केलं आहे. "महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील घटना अत्यंत वेदनादायी आहे. मृत बालकांच्या कुटुंबीयांचं मी सांत्वन करतो. मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की, या घटनेतील मृत आणि जखमी बालकांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करावी" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
The unfortunate incident of fire at Bhandara District General Hospital in Maharashtra is extremely tragic.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 9, 2021
My condolences to the families of the children who lost their lives.
I appeal to Maha Govt to provide every possible assistance to the families of the injured & deceased.
'भंडाऱ्यातील घटना मन हेलावून टाकणारी'; नरेंद्र मोदीही हळहळले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल तीव्र दुख व्यक्त केलं आहे. नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली असून नवजात बाळांनी आपला जीव गमावला आहे. नवजात बाळांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. तसेच जे बालक जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी भावना मी व्यक्त करतो, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे सांगितलं. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
Heart-wrenching tragedy in Bhandara, Maharashtra, where we have lost precious young lives. My thoughts are with all the bereaved families. I hope the injured recover as early as possible.
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2021
मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ठेवलं जातं. लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर तातडीनं रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढलं.
Ex-gratia of Rs 5 lakhs each to be provided to the kin of the deceased in the fire incident at Bhandara District General Hospital: Rajesh Tope, Health Minister, Maharashtra pic.twitter.com/Qnsct8zeEj
— ANI (@ANI) January 9, 2021