सूरत - गुजरातमधीलसूरत येथे असलेल्या ओएनजीसीच्या प्लँटमध्ये भीषण आग लागली . ही आग गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास लागली असून, आगीवर नियंत्रण मिवळण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, प्लँटमध्ये एक मोठा स्फोट झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली याबाबतची नेमकी माहिती समोर आलेली नाही. दरम्यान आता ही आग नियंत्रणात आल्याचे ओएनजीसीने सांगितले. सूरतमधील ओएनजीसी प्लँटमध्ये लागलेल्या आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन ठिकाणी आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत. हा व्हिडीओ प्लँटच्या जवळच असलेल्या पुलावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने चित्रीत केला आहे. सुरतमधील ओएनजीसीच्या हाझिरा प्लँटमध्ये पहाटे तीनच्या सुमारास लागोपाठ तीन स्फोट झाले. अशी माहिती सूरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी दिली.
दरम्यान, सूरतमधील हाझिरा प्लँटमधील ही आग नियंत्रणात आल्याचे ओएनजीसीकडून सांगण्यात आले आहे. तसेच या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तसेच कुणीही जखमी झालेले नाही, असेही ओएनजीसीने स्पष्ट केले आहे.