अग्निशामक दलाची दुरावस्था: एमआयडीसी केंद्रावरील बंब धक्का स्टार्ट; लोकसंख्या पाच लाख फायरफायटर चार आग लागली..पळा..पळा.. अन् पाणी शोधा
By admin | Published: March 15, 2016 12:32 AM
जळगाव : आग लागली की पाण्यासाठी धावपळ करा अशी शहरातील अग्निशामक दलाची स्थिती असून चार पैकी केवळ एका केंद्रावर बंबात पाणी भरण्याची सुविधा असून एवढ्या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येते.
जळगाव : आग लागली की पाण्यासाठी धावपळ करा अशी शहरातील अग्निशामक दलाची स्थिती असून चार पैकी केवळ एका केंद्रावर बंबात पाणी भरण्याची सुविधा असून एवढ्या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येते. शहराची लोकसंख्या जवळपास पाच लाख आहे. शहरालगत १२०० लहान मोठे उद्योग असलेली औद्योगिक वसाहत आहे. तेथे हजारो कामगार काम करत असतात. मोठा व्याप शहर परिसरात असताना अग्निशमन यंत्रणेबाबत उदासिनताच दिसून येत आहे. असा आहे नियमशहरातील लोकसंख्यनुसार अग्निशामक दलाची निर्मिती असणे गरजेचे आहे. ५० हजार लोकसंख्येमागे एक फायर फायटर असावा असा शासकीय नियम आहे. मात्र हा नियम जळगावसाठी लागू नसल्याचीच परिस्थिती दिसून येते. पाच लाख लोकसंख्येची मदार केवळ चार फायर फायटरवर असल्याचे लक्षात येते. तेदेखील काय सुस्थितीत आहेत अशी परिस्थिती नाही. पाण्यासाठी वणवणशहरात अग्निशामक दलाचे मुख्यालय गोलाणी मार्केटमध्ये आहे. तेथील परिस्थिती फार समाधानकार आहे असे नाही. दुसरे शिवाजीनगरमध्ये, तिसरे एमआयडीसी व चौथे महाबळ रोडला काव्यरत्नावली चौकात आहे. पैकी केवळ शिवाजी नगर अग्निशामक दलाच्या केंद्रावर पाणी भरण्याची व्यवस्था आहे. अन्य तीन ठिकाणी अशी व्यवस्था नाही आणि जेथे होती तीदेखील बंद झाली आहे. गोलाणी केंद्र, एमआयडीसी, महाबळ येथे पाणी भरण्याची व्यवस्था नाही. पाणी भरण्याचे पंपही भक्कम नाहीत त्यामुळे बंब भरण्यास वेळ लागतो. क्रॉसबारचा अडथळाशिवाजीनगरच्या अग्निशामक केंद्रावर पाणी भरण्यास जायचे असल्यास पुलाच्या क्रॉसबारचा अडथळा झाला आहे. त्यामुळे गुजराल पेट्रोपंपाकडून म्हणजे जवळपास चार किलो मिटरचा फेरा मारून या केंद्रावर पाणी भरण्यास जावे लागत असते. पाणी भरण्याचे दुसरे केंद्र मेहरूणकडील शिवाजी उद्यानात आहे. तेथेही बंबात गतीने पाणी भरले जात नाही. कर्मचारीही कमीचनियमानुसार एका बंबावर सहा कर्मचारी असणे बंधनकारक आहे. अशी परिस्थिती मात्र एकाही केंद्रावर दिसत नाही. या विभागातील ७० कर्मचार्यांना पुरेसे प्रशिक्षण नाही. तसेच आगीची एखादी गंभीर घटना घडल्यास पुरेसे संरक्षणाचे कपडेही त्यांच्याकडे नाहीत. त्यासाठीचे प्रस्तावही प्रलंबित असल्याचे समजले. -----