स्वयंपाक करताना गॅसची नळी निघाल्याने घरात आग कंजरवाड्यातील घटना : भाट कुटूंब बालंबाल बचावले, तीन लाखाच्यावर नुकसान
By admin | Published: October 08, 2016 11:51 PM
जळगाव: घरात स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर गॅसची नळी निघाल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणातच संपूर्ण घरात आग लागली. सिलिंडर स्फोट होण्याआधीच घरातील मंडळी बाहेर पडाल्याने ते बालंबाल बचावले. जुनी जोशी कॉलनीला लागून असलेल्या कंजरवाड्यात शनिवारी संध्याकाळी धीरज रमेश भाट यांच्या घरात ही घटना घडली. या घटनेत दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ७० हजार रुपये रोख व घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य खाक झाले आहे. तीन लाखाच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जळगाव: घरात स्वयंपाक करत असताना अचानक सिलिंडर गॅसची नळी निघाल्याने आगीचा भडका उडाला. काही क्षणातच संपूर्ण घरात आग लागली. सिलिंडर स्फोट होण्याआधीच घरातील मंडळी बाहेर पडाल्याने ते बालंबाल बचावले. जुनी जोशी कॉलनीला लागून असलेल्या कंजरवाड्यात शनिवारी संध्याकाळी धीरज रमेश भाट यांच्या घरात ही घटना घडली. या घटनेत दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ७० हजार रुपये रोख व घरातील संसारोपयोगी सर्व साहित्य खाक झाले आहे. तीन लाखाच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.कंजरवाड्यात अतिशय दाट वस्तीत धीरज भाट हे वरच्या मजल्यावर राहतात. अडीच ते तीनशे चौरस फुटाच्या खोलीत लाकडी दरवाजाच्या बाजूलाच गॅस सिलिंडर, बेड, अंथरुण, कपडे व अन्य साहित्य आहे. पत्नी रंजना भाट या पालक पनीरची भाजी बनवत असताना पती धीरज, मुलगी भूमी, शिरी व मुलगा तनीश हे शेजारी बेडवर बसून टिव्ही पाहत होते. अचानकपणे शेगडीतून नळी निघाल्याने गॅस बाहेर निघाला व आगीचा भडका उडाला. हा प्रकार पाहताच भाट यांनी तातडीने पत्नी व मुलांना सोबत घेत घराबाहेर धाव घेतली.अन् मोठा अनर्थ टळलाभाट परिवार जोराने आरडाओरड करत असल्याचे पाहून गल्लीतील नागरिकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. आगीचे लोळ व धूर पाहता घरात आग लागल्याचे आगीची बातमी वार्यासारखी पसरुन पळापळ झाली. जग्गू भाट याने पेटती नळी तोडून सिलिंडर घराच्या बाहेर काढले तर समीर तडवी व प्रदीप नेतलेकर यांनी शेजारचा दरवाजा तोडून रस्ता मोकळा केला. विशाल जोशी या तरुणाने अग्निशमन दल, पोलीस नियंत्रण कक्ष व एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. शेजारच्यांच्या घरातून पाणी आणून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.अग्निशमनचा बंब आला, मात्र उपयोग नाहीघटनेची माहिती दिल्यानंतरही अग्निशमन दलाचा बंब उशिरा पोहचल्याचा आरोप नागरिकांनी केला. उशिरा येऊन बारीक गल्ल्यांमुळे घटनास्थळावर बंब पोहचू शकला नाही. त्यामुळे त्याचा उपयोगच झाला नाही. पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, सहायक निरीक्षक सचिन बागुल, समाधान पाटील यांनी घटनास्थळ गाठून आगीचे कारण जाणून घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.