बडोदा : गुजरातच्या बडोदा शहरातील कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूला भीषण आग लागली आहे. या हॉस्पिटमध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्याचे कळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब रवाना झाले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
सयाजीराव जनरल हॉस्पिटलमध्ये ही आग लागली होती. आगीमुळे कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये मोठी खळबळ उडाली. यानंतर हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली. यानंतरअग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी आले होते.
कोरोना रुग्णांना हॉस्पिटलबाहेर काढण्यात आले यांनतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये ही आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत.
गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 6 ऑगस्टला अहमदाबादमधील कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या एका हॉस्पिटलला भीषण आग लागली होती. यामध्ये जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटललाआग लागल्यानंतर कोरोनावर उपचार घेत असलेल्या 35 रुग्णांना तातडीने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलच्या आयसीयू युनिटमध्ये अचानक आग लागली होती.
महत्वाच्या बातम्या...
देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; 'जलयुक्त शिवार' अपयशी ठरल्याचा कॅगचा ठपका
काम करताना इगो नसावा, पण शॉर्टकटही मारू नये; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला सुरुवात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
चीनची धमकी! भारताने रक्तरंजित संघर्षासाठी तयार रहावे; हद्द पार केली
कंगना मुंबईला निघाली! रोडमॅप तयार; मनालीहून एक दिवस आधीच रवाना
मुंबईला पीओके बोलणे कंगनाला भोवले; विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव
सुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले? स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा