नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील किर्ती नगर परिसरात असलेल्या फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. याबाबतची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यात येत आहे. सुदैवाने कुठलिही जिवितहानी झाली नसल्याचे समजते.
शहरातील फर्निचर मार्केटमध्ये रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. याबाबत माहिती मिळताच, स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि उपस्थितांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्शिमन दलालाही पाचारण करण्यात आले. मात्र, आगीत मोठ्या प्रमाणात फर्निचर आणि सामान जळून खाक झाल्याचे दिसून येत आहे. आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. दरम्यान, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.