ऑनलाइन लोकमत
शिवकाशी, दि, 20 - तामिळनाडूमधील शिवकाशी येथे फटाक्यांच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत सहा जण ठार झाले. गुरुवारी गोदामातील फटाके एकीकडून दुसरीकडे हलवत असताना ही आग लागली.
या आगीचे स्वरूप एवढे भीषण होते की, ज्यामुळे परिसरातील 20 वाहने आणि जवळ असलेल्या रुग्णालयाचेही नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना सुरक्षित स्थळी हववण्यात आले आहे. तसेच या आगीत जखमी झालेल्यांना शिवकाशी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. भारतातील सर्वात मोठे फटाक्यांचे केंद्र म्हणून शिवकाशी प्रसिद्ध आहे. तसेच येथील फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. दरम्यान, ऐन दिवाळीपूर्वी येथील गोदामाला आग लागल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
#WATCH: Moment when fire broke out at a fire cracker factory in Sivakasi (Tamil Nadu) killing 9. Fire has now been doused. pic.twitter.com/RE5Tyie9eF— ANI (@ANI_news) October 20, 2016
#UPDATE : 9 dead after fire broke out in a fire cracker factory in Sivakasi (Tamil Nadu). Fire has now been doused. pic.twitter.com/woCYAYhMKr— ANI (@ANI_news) October 20, 2016