अग्निशामक दल बंब जोड ३ काव्यरत्नावली चौक अग्निशामक केंद्र
By admin | Published: March 15, 2016 12:35 AM
महाबळ कॉलनी रोडवरील काव्यरत्नावली चौकात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची टाकी आहे. अतिशय विस्तीर्ण असा या टाकीचा परिसर आहे. या भागात पूर्वी पाणी पुरवठा विभाग व अग्निशामक दलाचा विभाग एकत्र बसत असे. मात्र गेल्या वर्षी या ठिकाणी बंब उभे करण्याची बंदिस्त व्यवस्था व एक छोटे कार्यालयात करण्यात आले आहे. या केंद्रावरही एक बंब आहे. मात्र तो बर्याचदा पाणी पुरवठा कमी झालेल्या भागात पाणी पुरविण्यासाठी वापरला जात असतो. त्यामुळे केंद्राच्या क्षेत्रात एखादी आगीची घटना अचानक घडल्यास मोठी धावपळ होऊ शकते. याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचेच लक्षात येते. या केंद्रावरही पूर्वी पाणी भरण्याची सुविधा होतीदेखील बंद झाली आहे. आता बंबात पाणी भरायचे असल्यास शिवाजी उद्यानाकडे धाव घ्यावी लागत असल्याचे सांगण्यात आले. एका बंबावर सहा कर्मचारी असल्याच्या नियमाला येथेही तिलांजली दिली असल्याचेच्
महाबळ कॉलनी रोडवरील काव्यरत्नावली चौकात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची टाकी आहे. अतिशय विस्तीर्ण असा या टाकीचा परिसर आहे. या भागात पूर्वी पाणी पुरवठा विभाग व अग्निशामक दलाचा विभाग एकत्र बसत असे. मात्र गेल्या वर्षी या ठिकाणी बंब उभे करण्याची बंदिस्त व्यवस्था व एक छोटे कार्यालयात करण्यात आले आहे. या केंद्रावरही एक बंब आहे. मात्र तो बर्याचदा पाणी पुरवठा कमी झालेल्या भागात पाणी पुरविण्यासाठी वापरला जात असतो. त्यामुळे केंद्राच्या क्षेत्रात एखादी आगीची घटना अचानक घडल्यास मोठी धावपळ होऊ शकते. याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचेच लक्षात येते. या केंद्रावरही पूर्वी पाणी भरण्याची सुविधा होतीदेखील बंद झाली आहे. आता बंबात पाणी भरायचे असल्यास शिवाजी उद्यानाकडे धाव घ्यावी लागत असल्याचे सांगण्यात आले. एका बंबावर सहा कर्मचारी असल्याच्या नियमाला येथेही तिलांजली दिली असल्याचेच लक्षात येते. बंबावर तीन ते चार कर्मचारी असतात. म्हणजे दोन ते तीन कर्मचारी येथेेही कमी असल्याचे लक्षात येते. बर्याच वेळेस या परिसराचा खाजगी वापर होत असतो मात्र त्याकडेही मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष होते.