श्रीनगर : काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्णातील पुचाल भागात बुुधवारी सशस्त्र दलांसोबत उडालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले, तर लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर आणि अन्य चार दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले.स्थानिक नागरिकांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर तूफान दगडफेक करून त्यांना विचलित केल्यामुळे हे दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले. पळून गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा काश्मीर प्रदेश प्रमुख अबू दुजाना याचा समावेश आहे.
काश्मिरात चकमक, दोन दहशतवादी ठार
By admin | Published: March 10, 2016 2:41 AM