बंगळुरूमधील कोरमंगला भागातील एका उंच इमारतीला भीषण आग लागली आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्मशियल इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या 'मड पाईप कॅफे' नावाच्या पबमध्ये आग लागली, ज्यामध्ये जिम आणि कार शोरूम देखील आहे. अग्निशमन दलाच्या किमान सहा गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात इमारतीतून धूर निघताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती इमारतीच्या वरच्या भागावरून उडी मारताना दिसत आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत.
आगीत अडकलेल्या तरुणाने भीतीपोटी चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या तो जिवंत असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पबमध्ये आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु परिसरातील लोकांनी मोठा आवाज ऐकला होता, जो सिलिंडरचा स्फोट झाल्याचे संकेत देत आहे. इमारतीतून धूर निघत असल्याचं लक्षात येताच इतरांना अलर्ट केलं.
अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले की, पोलीस आणि अग्निशमन दलाला सतर्क करण्याबरोबरच त्यांनी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. विरुधुनगर जिल्ह्यातील रंगापालयम आणि किचनायकनपट्टी भागात मंगळवारी दोन फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटात किमान 13 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.