नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीची पुन्हा एकदा कमान महिलेच्या हाती गेली आहे. आम आदमी पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्रिपदासाठी आतिशी मार्लेना यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी आतिशी यांनी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासोबत नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांची भेट घेतली. काल आपच्या आमदारांची केजरीवाल यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. त्यात आतिशी यांची सभागृह नेतेपदी निवड केली. ईडीने अटक केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला. पाच महिन्यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
त्यामुळे निवडणुकीपर्यंत आपण मुख्यमंत्रीपदी राहणार नाही. त्यानंतर जनतेची इच्छा असेल तर ते पुन्हा निवडून देतील, अशी घोषणा करून मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार काल राजीनामा देत 'आप'च्या फायर ब्रँड नेत्या आतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा केली.
आपचे नेते गोपाल राय यांनी सांगितले की, आतिशी यांच्याकडे पक्षाने दोन प्रमुख जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
एक म्हणजे, दिल्लीच्या जनतेसाठी पक्षाने सुरू केलेले काम चालू ठेवणे. दुसरे त्यामुळे निवडणुकीपर्यंत आपण मुख्यमंत्रीपदी राहणार नाही. त्यानंतर जनतेची इच्छा असेल तर ते पुन्हा निवडून देतील, अशी घोषणा करून मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार काल राजीनामा देत 'आप'च्या फायर ब्रँड नेत्या आतिशी मार्लेना यांच्या नावाची घोषणा केली. म्हणजे, दिल्ली सरकारच्या धोरणांना भाजपाकडून नख लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रयत्न हाणून पाडण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे. आतिशी यांच्याकडे सध्या वित्त, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम अशी प्रमुख खाती आहेत.
फायर ब्रँड नेत्या... • ४५ वर्षीय आतिशी मार्लेना या २०२० च्या विधानसभा निवडणुकीवेळी प्रथमच निवडून आलेल्या आम आदमी पक्षाच्या आमदार. आतिशी अगोदर मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्रीपदी असताना सिसोदिया यांच्या सल्लागार होत्या. • शिक्षण क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम दिल्ली सरकारने राबवले त्यात आतिशीचे मार्गदर्शन मोलाचे ठरले होते. आतिशी मंत्री झाल्या तेव्हा त्यांच्याकडे शिक्षण, सार्वजनिक बांधकाम अशी खाती आली. • आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. भाजपच्या स्वर्गीय सुषमा स्वराज व काँग्रेसच्या स्वर्गीय शीला दीक्षित यांच्यानंतर आता आतिशी यांचा क्रमांक लागतो.
आतिशी कोण आहेत?
१. आतिशी ह्या पंजाबी राजपूत कुटुंबातील आहेत. त्या उच्चशिक्षित आहेत. त्यांचे आई वडील प्रोफेसर होते. दिल्लीतील कलकाजी हा आतिशी यांचा विधानसभा मतदारसंघ असून त्य वयाच्या ४३ व्या वर्षी मंत्री झाल्या. सिसोदिया यांना तेव्हा अटक झाली होती.
२. बालपणापासून आतिशीची वाढ दिल्लीतच झाली. तिने २००१ साली दिल्लीतील सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून इतिहास विषय घेऊन पदवी शिक्षण पूर्ण केले. मग ऑक्सफर्ड विद्यापीठातून तिने २००३ साली इतिहासात मास्टर्स पदवी प्राप्त केली. दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक विजय सिंग तोमर आणि त्रिप्ता वाही यांचे आतिशी हे कन्यारत्न. जून १९८१ मध्ये तिचा जन्म झाला.
३. २०१३ साली आतिशीने आम आदमी पक्षासाठी काम सुरू केले होते. २०१९ साली भाजपचे गौतम गंभीर यांनी लोकसभा निवडणुकीत तिचा पराभव केला होता. पण ति काम सुरूच ठेवले व २०२० साली विधानसभा निवडणुकीत बाजी मारली.
४• त्यावेळी भाजपच्या धरमबीर सिंग यांचा ति पराभव केला. आपमध्ये अरविंद केजरीवाल यांनी सतत त्यांना प्रोत्साहन दिले. केजरीवाल यांना त्या आपल्या गुरु मानतात. आतिशीने यापूर्वी गोव्यातही राजकीय कामाचा अनुभव घेतलेला आहे.