शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

तेलंगण मुख्यमंत्र्यांच्या यज्ञात राष्ट्रपती येण्यापूर्वी आग

By admin | Published: December 28, 2015 4:22 AM

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या ‘यज्ञ’स्थळी रविवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही प्राणहानी झाली नाही आणि आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यात आले.

सात कोटींचा खर्च; मुखर्जींचा दौरा रद्दहैदराबाद : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या ‘यज्ञ’स्थळी रविवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही प्राणहानी झाली नाही आणि आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यात आले. दरम्यान आगीच्या घटनेनंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेटही रद्द करण्यात आली. ते रविवारी शेवटच्या दिवशी पूर्णाहुतीच्या वेळी यज्ञस्थळाला भेट देणार होते. राव यांनी मेडक जिल्ह्याच्या एर्रावेल्ली गावातील आपल्या फार्महाउसवर हा पाच दिवसांचा ‘आयुथा चंडी महायज्ञ’ आयोजित केलेला होता. रविवारी दुपारी १.३० वाजता यज्ञ सुरू असताना ‘होमकुडा’पासून आग भडकली आणि लगेच ‘यज्ञशाला मंडपा’पर्यंत पोहोचली. ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे तीन बंब कामी आले. या आगीत यज्ञशाला मंडप जळाले. संपूर्ण यज्ञमंडप बांबू आणि गवताने बांधलेला होता, त्यामुळे आग झटकन पसरली. सुमारे पाऊण तासाने आग विझविण्यात आली. हजारो भविकांची गर्दी होती. पण आग लागताच पोलिसांनी बॅरिकेड तोडून वाट मोकळी केली. परिणामी भीतीमुळे होणाऱ्या संभाव्य चेंगराचेंगरीचा धोकाही टळला.राष्ट्रपती मुखर्जी हे यज्ञाच्या शेवटच्या दिवशी येथे भेट देणार होते. पण आता त्यांची ही भेट रद्द करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. लोककल्याण आणि विश्व शांतीसाठी या यज्ञाचे आयोजन केले आहे. २३ डिसेंबरपासून प्रारंभ झालेल्या या यज्ञासाठी राव यांनी किमान सात कोटी रुपये खर्च केले आहेत. या यज्ञात तेलंगण, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूतील २००० पुजारी भाग घेत आहेत. दरम्यान, दुष्काळग्रस्त तेलंगणमध्ये यज्ञावर सात कोटी रुपये खर्च केल्याबद्दल टीका करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)——————————राष्ट्रपती येऊन परतले?दु. १.३० ते २.३० या वेळात महायज्ञाची पूर्णाहुती होणार होती. त्यासाठी राष्ट्रपती येण्याच्या काही मिनिटे आधीच यज्ञशळेत आग लागली. आगीचे लोळ उठत असताना तीन हेलिकॉप्टर त्या परिसरावर घिरटया घालताना दिसल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले. राष्ट्रपतींना घेऊन आलेल्या हेलिकॉप्टरचा तो ताफा होता का? आणि राष्ट्रपती यज्ञस्थळापर्यंत येऊन आगीमुळे परत गेले का? या प्रश्नांची नक्की उत्तरे मिळाली नाहीत.