शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

केमिकल विक्रीच्या तीन दुकानांना आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2016 12:20 AM

जळगाव: नवीन बी.जे.मार्केटमध्ये दुसर्‍या मजल्यावर असलेल्या जिनेंद्र सायन्टेफिक या प्रयोगशाळेचे केमिकल्स विक्रीच्या तीन दुकानांना रविवारी पहाटे पाच वाजता अचानक आग लागली. यात जिवित हानी झाली नसली तरी दुकानातील केमिकल्स, काचेचे भांडे, फर्निचर, वायरींग व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. यात १८ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तीन तास हे अग्नितांडव सुरु होते.

जळगाव: नवीन बी.जे.मार्केटमध्ये दुसर्‍या मजल्यावर असलेल्या जिनेंद्र सायन्टेफिक या प्रयोगशाळेचे केमिकल्स विक्रीच्या तीन दुकानांना रविवारी पहाटे पाच वाजता अचानक आग लागली. यात जिवित हानी झाली नसली तरी दुकानातील केमिकल्स, काचेचे भांडे, फर्निचर, वायरींग व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. यात १८ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तीन तास हे अग्नितांडव सुरु होते.
नवीन बी.जे.मार्केटच्या दुसर्‍या मजल्यावर बहुतांश केमिकल्स विक्रीचेच दुकाने आहेत. पंकज विजय जैन यांच्या मालकीचे जिन्याला लागूनच एकापाठोपाठ तीन दुकाने आहेत. शाळा, महाविद्यालयातील प्रयोगशाळा तसेच पॅथोलॉजी लॅबोरटरीमध्ये लागणारे केमिकल्स विक्रीचे जैन हे होलसेलर आहेत. शनिवारी नेहमी प्रमाणे दुकान बंद करुन ते घरी गेले होते. विशेेष म्हणजे दुकान बंद करताना वीजेचा मुख्य सप्लायचे बटन बंद करुन ते घरी गेले होते.
पहाटेच आला अज्ञात व्यक्तीचा फोन
पंकज जैन हे घरी झोपले असताना पहाटे पाच वाजता त्यांना एका व्यक्तीने दुकानातवर लिहिलेल्या क्रमांकावरुन फोन करुन आगीची माहिती दिली. घाबरलेल्या अवस्थेत जैन हे पत्नीला सोबत घेवून मार्केटला आले असता लांबूनच आगीचे गोळे दिसत होते. यावेळी काही जणांनी साडे पाच वाजता मनपाच्या अग्निशमन दलालाही फोन करुन माहिती कळविली होती.
दहा बंब पाणी लागले
आग इतकी भयंकर होती की पाहणार्‍यांचाच थरकाप उडत होता. मनपाचे गोलाणी मार्केट, महाबळ व एमआयडीसी असे तीन व जैन कंपनीचे (बांभोरी) दोन अशा पाच बंबाद्वारे आग विझविण्यात आली. पाचही बंब प्रत्येकी दोन वेळा भरुन रिकामे झाले. पंधरा ते २० कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेवून चार तासानंतर आग आटोक्यात आणली.
पंकज जैन यांना धक्का
आगीनंतर दुकानात सर्व वस्तूंचा झालेला कोळसा पाहिल्यानंतर पंकज जैन यांना जबर धक्का बसला. यावेळी रडता रडता ते सुन्न झाले होते. पत्नी व शेजारच्या दुकानदारांनी त्यांना या धक्कयातून सावरले. पत्नीलाही अश्रु आवरणे कठीण झाले होते. आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. केमिकल्सच्या वस्तुचा आतमध्ये स्फोट झाला असावा अशी शंका उपस्थित करण्यात आली. यात लोखंडी कपाट व शटरही जळालेले आहे. आगीमुळे भींतीला तडे गेले आहेत.दुकानातील एकही वस्तू शिल्लक राहिलेली नाही.