शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
2
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
3
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
4
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
5
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
6
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?
7
ओव्हरमध्ये ६ सिक्सर मारायला चुकला; पण Sanju Samson नं या गोलंदाजाला लय वाईट धुतलं! (VIDEO)
8
"होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी’’, शिंदेंचा विरोधकांना आठवलेस्टाईल टोला
9
"मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणणार’’, दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
10
रेकॉर्ड तोडफोड मॅच! ३०० पारची संधी हुकली, पण २९७ धावांसह टीम इंडियानं नोंदवले अनेक विक्रम
11
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
12
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
13
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
14
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
15
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
16
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
17
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
18
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
19
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
20
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!

कोरोनानं मृत्यू झालेल्या १ हजार मृतदेहांना अग्नी देणाऱ्याची हृदयपिळवटून टाकणारी कहाणी, सर्पदंशानं झाला मृत्यू! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 8:20 PM

इंदूरचा 'जिंदा भूत' नावानं ओळखले जाणारे प्रदीप कनोजिया आता भोपाळच्या भदभदा स्मशान घाटावर दिसणार नाहीत. गेल्या ३० वर्षांपासून प्रदीप कनोजिया भोपाळमधील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत होते.

भोपाळ-

इंदूरचा 'जिंदा भूत' नावानं ओळखले जाणारे प्रदीप कनोजिया आता भोपाळच्या भदभदा स्मशान घाटावर दिसणार नाहीत. गेल्या ३० वर्षांपासून प्रदीप कनोजिया भोपाळमधील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करत होते. सर्पदंशानं त्यांचा मृत्यू झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये त्यांना कधीच विषाणूचा संसर्ग झाला नाही. त्यांना कधीही कुणी विचारलं तर ते 'मी स्वत: जिवंत भूत आहे', असं मस्करीत म्हणायचे. 

कोरोनाच्या काळात भीतीपोटी कुटुंबीय आपल्या प्रियजनांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येत नसताना त्यांनीच हजाराहून अधिक मृतदेहांना अग्नी देण्याचं काम केलं होतं. या कामासाठी त्यांना पोलिसांकडून 'कोरोनावीर' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 

मूळचे इंदूरचे रहिवासी असलेले प्रदीप कनोजिया उर्फ ​​दल्ली भैया यांनी आतापर्यंत २५ हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. २३ मार्च रोजी ते भोपाळ पोलीस लाइन्सच्या २५ व्या बटालियनमधील एका घरात आढळून आलेल्या सापाची सुटका करण्यासाठी पोहोचले होते. तांनी सापाला पकडलं होतं पण पेटीत बंद करत असतानाच सापानं त्यांना दंश केला. त्यांना हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथं सहा दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी केला होता सन्मान"प्रदीप यांनी कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये रात्रंदिवस काम केलं. भोपाळ पोलिसांनी त्यांना 'कोरोनावीर' पुरस्काराने सन्मानित केलं होतं", असं प्रदीप यांच्या मावशीचा मुलगा राजेश कनोजिया यांनी सांगितलं. प्रदीपसोबत काम केलेले भगवान सिंह यांनी प्रदीप कधीच ड्युटी एवढंच काम करत नसत. कोणीही फोन केला की ते हजर असायचे. कोरोनाच्या काळात अनेकवेळा असे लोक आले, ज्यांच्याकडे अंत्यसंस्कारासाठीही पैसे नव्हते अशा परिस्थितीत दिल्ली भैय्यानं आपल्या खिशातून पैसे खर्च करुन मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले असं सांगितलं. 

दोन वर्षांपूर्वीही झाला होता सर्पदंशअंत्यसंस्कार व्यतिरिक्त प्रदीप साप आणि विंचू पकडण्याचंही काम करायचे. त्यांना शहरातील लोकांनी साप आणि विंचू पकडण्यासाठी बोलावलं होतं. दोन वर्षांपूर्वीही त्यांना सर्पदंश झाला होता. त्यावेळीही ते अनेक दिवस रुग्णालयात होते. पण ते उपचारानंतर बरे झाले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश