जवानाच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळे सहकारी जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 10:10 AM2018-11-16T10:10:26+5:302018-11-16T10:12:37+5:30
सैन्यातील जवानाच्या बंदुकीची गोळी एका सहकारी जवानाला लागल्याची घटना समोर आली आहे. बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळे जवान जखमी झाला आहे.
बिलासपूर - सैन्यातील जवानाच्या बंदुकीची गोळी एका सहकारी जवानाला लागल्याची घटना समोर आली आहे. बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळे जवान जखमी झाला आहे. मध्यप्रदेशमधील निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी (15 नोव्हेंबर) ही घटना घडली. जखमी जवानाला उपचारासाठी आमला येथील हवाई दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बिलासपूर-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस नागपूरहून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला. राजधानी एक्स्प्रेसमधून पाच जवान प्रवास करत होते. ते एका आरोपीला घेऊन चालले होते. त्याचदरम्यान एका जवानाकडील बंदुकीतून गोळी सुटली. जवानाच्या बंदुकीतून गोळी सुटून ती दुसऱ्या एका सहकारी जवानाच्या पायाला लागली. मात्र हा प्रकार नेमका कसा घडला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
बिलासपूर - जवानाच्या बंदुकीची गोळी सहकारी जवानाला लागली, मध्यप्रदेशमधील निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमधील घटना
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 16, 2018