कोपेनहेगन कॅफेवर गोळीबार.... एक ठार सुधारित
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
कॅफेवर गोळीबार (डेन्मार्क)
कॅफेवर गोळीबार (डेन्मार्क)कोपेनहेगन कॅफेवर गोळीबार, १४ फेब्रुवारी २०१५कोपेनहेगन कॅफेवर गोळीबार; एक ठारकोपेनहेगन : उत्तर कोपेनहेगनमधील कॅफेवर एका हल्लेखोराने बेछूट गोळीबार करीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. जाझसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रूडट्टोएनडेन कॅफेत स्वीडीश कलाकार लार्स व्हिलक्सने परिसंवादाचे आयोजन केले होते. या हल्ल्यात एक जण ठार झाल्याचे वृत्त आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर वाहनातून पसार झाला. टीव्ही-२ चॅनलच्या वृत्तानुसार हल्लेखोराने या कॅफेच्या खिडकीत ३० गोळ्या झाडल्या. दोन व्यक्तींना स्ट्रेचरवरून नेण्यात आले. यात एका पोलीस अधिकार्याचा समावेश आहे. कला, ईशनिंदा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असा या परिसंवादाचा विषय होता.डेन्मार्कमधील फ्रेंच राजदूत फ्रॅन्कोईस झिमेरी हेही यावेळी या कॅफेतील सभागृहात उपस्थित होते. हेली मेरेट ब्रिक्स यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, कलाकार लार्स व्हिलक्स हेही यावेळी उपस्थित होते. सुदैवाने ते जखमी झाले नाहीत. एका बुरखाधारी व्यक्तीला पळत जाताना मी पाहिले. लार्स व्हिलक्स हेच हल्लखोरांचे लक्ष्य होते, असेही त्यांनी सांगितले. स्वीडीश कलाकार लार्स व्हिलक्स यांना अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असून, त्यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्न झाले. पेनेस्लिव्हियाच्या एका महिलेने लार्स व्हिलक्स यांना ठार मारण्याचा कट केला होता. तिला गेल्या वर्षी १० वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला.