शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

पाकिस्तानचा सीमेवरील चौक्यांवर गोळीबार

By admin | Published: January 30, 2015 9:11 PM

जम्मू- पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू जिल्‘ाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्या आणि गावांवर गुरुवारी रात्रभर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. त्यांना सीमा सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले.

जम्मू- पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्या आणि गावांवर गुरुवारी रात्रभर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. त्यांना सीमा सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अरनिया आणि आर.एस.पुरा उपसेक्टरमधील नागरी वसाहती आणि चौक्यांना लक्ष्य बनविण्यात आले. सीमेवर तैनात बीएसएफ जवानांनी लगेच प्रत्युत्तरात गोळीबार सुरू केला. पहाटे २.३० वाजेपर्यत ही चकमक सुरू होती. या भागातून लोकांनी स्थलांतरण केले नसून स्थितीवर आमची बारीक नजर आहे. गरज पडल्यास त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येईल. जोरा फार्म,जगनूचक, खोडा, पिंडी, पित्तळ, चिनाज, विक्रमन, साई, निकोवाल आणि जबोवाल गावावर झालेल्या या तुफान गोळीबारात तीन जण जखमी झाले.
गेल्या एक आठवड्यात पाकिस्तानकडून सहावेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे.

दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत
सीमेपलीकडे दडून बसलेले दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. परंतु सीमा सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.
बीएसएफचे काश्मीर फ्रंटियरचे महानिरीक्षक पी.एस. संधू यांनी श्रीनगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न थांबणार नाहीत. ते संधीच्या शोधात आहेत. परंतु आमचे जवान त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाहीत. मोठ्या संख्येने दहशतवादी सीमेलगतच्या क्षेत्रात तळ ठोकून असून प्रशिक्षण शिबिरांमधील त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. (वृत्तसंस्था)