शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

बंगळुरूत साकारणार पहिलं 'आधार प्रणालीयुक्त विमानतळ', प्रवाशांची फक्त 10 मिनिटांत होणार पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2017 4:23 PM

कर्नाटकात लवकरच आधार प्रणालीयुक्त विमानतळ प्रत्यक्षात अवतरणार आहे. आता तुम्हाला विमानतळावर जागोजागी आयडी कार्ड ऐवजी फक्त मशिनच्या समोर हात दाखवावा लागणार आहे.

ठळक मुद्देकर्नाटकात लवकरच आधार प्रणालीयुक्त विमानतळ प्रत्यक्षात अवतरणार आहे. आता तुम्हाला विमानतळावर जागोजागी आयडी कार्ड ऐवजी फक्त मशिनच्या समोर हात दाखवावा लागणार आहे. अथक प्रयत्नानंतर मार्च 2018मध्ये बंगळुरूतल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातली पहिली आधार प्रवेश व बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीम अस्तित्वात येणार आहे.

बंगळुरू - कर्नाटकात लवकरच आधार प्रणालीयुक्त विमानतळ प्रत्यक्षात अवतरणार आहे. आता तुम्हाला विमानतळावर जागोजागी आयडी कार्ड ऐवजी फक्त मशिनच्या समोर हात दाखवावा लागणार आहे. अथक प्रयत्नानंतर मार्च 2018मध्ये बंगळुरूतल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातली पहिली आधार प्रवेश व बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीम अस्तित्वात येणार आहे.या विमानतळामुळे प्रवाशांची जागोजागी चेकपॉइंटवर आयडी व बोर्डिंग पास दाखवण्याची कटकट संपणार आहे. तसेच प्रवाशांचा वेळसुद्धा वाचणार आहे. खरं तर विमानतळांची सुरक्षा वाढवण्यासह प्रवाशांचा प्रवेश सुकर होण्यासाठी आता आधार बेस प्रवेशाला चालना देण्यात येत आहे. बायोमेट्रिक बोर्डिंग सिस्टीमनं तयार झालेलं बंगळुरूतील केआयए विमानतळ हे देशातील पहिलं आधार बेसद्वारे प्रवेश देणारं विमानतळ असणार आहे. सध्या इथे पायलट प्रोजेक्टही सुरू आहे.बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड(बीआयएएल)द्वारे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, मार्च 2018पर्यंत विमानतळावरील प्रवेशावर आधार व बायोमेट्रिक सिस्टीम लागू करण्यात येणार आहे. डिसेंबर 2018पर्यंत विमानतळ पूर्णतः आधार सिस्टीमनं युक्त करण्यात येणार आहे. बीआयएएलनुसार, विमानतळावर जागोजागी चेकपॉइंटवर प्रवाशांचा जवळपास 25 मिनिटांचा वेळ खर्ची पडतो. मात्र आधार आधारित प्रणालीमुळे ही सर्व प्रक्रिया केवळ 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे बोर्डिंग गेटच्या आधी प्रत्येक चेकपॉइंटवर फक्त पाच सेकंदच पडताळणी होणार आहे. तसेच ही प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर सर्वाधिक प्रवासी एकाच गेटमधून प्रवेश घेऊ शकणार आहेत.या प्रक्रियेमुळे पडताळणी करणंही सोपं जाणार आहे. तसेच सुरक्षेतही पारदर्शकता येणार आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून पडताळणी करून प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर केला जाणार आहे, अशी माहिती बीआयएएलचे कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष हरी मरार यांनी दिली आहे. तसेच या बायोमेट्रिक प्रणालीमुळे प्रवासी संख्येतही वाढ होणार आहे. बीआयएएलनं ही नवी प्रणाली बसवण्यासाठी 325 दिवसांची मुदत निश्चित केली आहे. मार्च 2018पर्यंत विमानतळांवर आधार आधारित प्रवेश सुरू करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Airportविमानतळ