शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मराठी उद्योजकांच्या संघटनेचा पहिला वर्धापन दिन ‘लॉर्डस्’वर

By admin | Published: May 07, 2017 1:09 AM

ब्रिटनमधील धडाडीच्या महाराष्ट्रीयन व्यावसायिक आणि उद्योजकांनी स्थापन केलेल्या OMPEG चा (महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संघटना) पहिला

केदार लेले/ आॅनलाइन लोकमतलंडन : ब्रिटनमधील धडाडीच्या महाराष्ट्रीयन व्यावसायिक आणि उद्योजकांनी स्थापन केलेल्या  OMPEG चा (महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजकांची संघटना) पहिला वर्धापन दिन प्रतिष्ठित लॉर्डस् मैदानावर नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या संघटनेची गेल्या वर्षी लंडनमध्ये स्थापन करण्यात आली होती.वर्धापन दिन सोहळ्याला उद्योजक उदय ढोलकिया, मिलिंद कांगले, जसबीर सिंग परमार आणि बनेश प्रभू आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले. या सोहळ्यासाठी ब्रिटनच्या विविध भागांतून अनेक महाराष्ट्रीयन व्यावसायिक आणि उद्योजक आले होते. वारसा हक्कपत्र, अर्थ आणि वित्त व्यवस्थापन, कर योजना यावरील चर्चासत्रात तज्ज्ञ विनिता देशपांडे, रंजिता दळवी, शिवानी प्रभुणे आणि अक्षय शहा यांनी आपले विचार मांडले, तसेच सल्ले दिले. राजन शेगुंशी, राजेंद्र देवकर आणि मयुरा चांदेकर यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थितांनी लॉर्डस् क्रिकेट ग्राऊंडच्या इव्हेन्ट मॅनेजमेंट टीमने आयोजित केलेल्या सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला! संघटनेने स्थानिक पातळीवरील उद्योजकांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी लंडनमध्ये प्रदर्शन मेळावा आयोजित करण्यासह अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. आॅनर्स पुरस्कारराजीव बेनोडेकर, राजन शेगुंशी, मानसी बर्वे, प्रणव देव, अभय जोशी, राहुल घोलप, मनोज वसईकर आणि मनोज कारखानीस यांना त्यांच्या योगदानाबद्दल डटढएॠ आॅनर्स पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.भावी उद्दिष्टेसंस्थापकांनी OMPEG ला २०२० पर्यंत २० नवीन उपक्रम किंवा प्रकल्प सुरू करण्याचे लक्ष्य दिले आहे. पहिल्याच वर्षी त्यापैकी तीन-चार उपक्रम हाती घेऊन, त्या दिशेने पावलेसुद्धा उचलण्यात आली आहेत.माजी क्रिकेटपटू व आर्थिक सल्लागार मधू गुप्ते मेरिलबोन क्रिकेट क्लबचे सदस्य असल्यामुळे पहिला वर्धापन दिन आणि चर्चासत्रासाठी लॉर्डस्चे प्रतिष्ठित स्थळ निश्चित करण्यात त्यांची मोलाची मदत झाली. संस्थेचे संस्थापक सभासद - अनिरुद्ध कापरेकर, सुशील रापतवार, जय तहसीलदार, अथर्व टिल्लू, रवींद्र गाडगीळ,अमरीश जोईजोडे आणि दिलीप आमडेकर यांनी संयुक्तरीत्या सूत्रसंचालन करण्यासह कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. डॉ. विजेंद्र इंगळे, मानसी बर्वे यांनी सोहळ्याचे चित्रीकरण आणि प्रक्षेपण केले.