नवी दिल्ली- भारताच्या हवाई दलात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर आता आणखी सक्षम होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी या विमानांसाठी अमेरिकेबरोबर करार करण्यात आला होता. अखेर भारताच्या ताफ्यात चार चिनूक हेलिकॉप्टर्स दाखल झाली आहेत. गुजरातमधल्या मुद्रा विमानतळावर 4 चिनूक हेलिकॉप्टर्स पोहोचली आहेत.सप्टेंबर 2015मध्ये भारताची बोइंग आणि अमेरिकी सरकारबरोबर 15 चिनूक हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासंदर्भात करार झाला होता. त्यानंतर ऑगस्ट 2017ला संरक्षण मंत्रालयानं अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर आणि 15 चिनूक मालवाहू हेलिकॉप्टरसह शस्त्रास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी अमेरिकेला 4168 कोटी रुपये देण्यास मंजुरीही दिली होती. अमेरिकेचे सैन्य दीर्घकाळापासून अपाचे आणि चिनूक हेलिकॉप्टर्सचा वापर करत आहे. दोन्ही हेलिकॉप्टरचा वापर कित्येक देश करतात. चिनूकचा वापर करणारा भारत हा 19 वा देश ठरणार आहे.
हम है जोश मे.... भारतीय हवाई दलात चिनूक हेलिकॉप्टर दाखल, ड्रॅगन अन् पाकची झोप उडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 3:42 PM