शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी १८ जूनला हवाई दलात

By admin | Published: March 09, 2016 5:07 AM

तीन सैनिकांचा समावेश असलेली महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी येत्या १८ जून रोजी भारतीय वायुदलात सामील करण्यात येईल.

नवी दिल्ली : तीन सैनिकांचा समावेश असलेली महिला लढाऊ वैमानिकांची पहिली तुकडी येत्या १८ जून रोजी भारतीय वायुदलात सामील करण्यात येईल. एअर चीफ मार्शल अरूप राहा यांनी मंगळवारी ही माहिती दिली. तीन महिला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी या लढाऊ भूमिकेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे राहा यांनी सांगितले.‘आम्ही १९९१ मध्ये महिलांना वैमानिकाच्या रूपात सामील केले होते. परंतु ते फक्त हेलिकॉप्टर्स आणि परिवहन (विमान) यापुरतेच मर्यादित होते. आता महिलांना लढाऊ वैमानिकाच्या रूपात सामील करण्याच्या भारतीय वायुदलाच्या (आयएएफ) प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल मी संरक्षण मंत्रालयाचे आभार मानतो. लवकरच म्हणजे १८ जून रोजी वायुसेनेत महिला लढाऊ वैमानिक दिसतील,’ असे राहा म्हणाले.नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित ‘वुमेन इन आर्म्ड मेडिकल कॉर्प्स’वर आयोजित संमेलनात राहा बोलत होते. यावेळी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते. संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये महिलांना लढाऊ वैमानिकाच्या रूपात भारतीय वायुदलात सामील करण्याच्या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवला. हा प्रस्ताव पुढे रेटल्याबद्दल पर्रीकर यांनी राहा यांची प्रशंसा केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)