चीन, अमेरिका आणि जपानसह अनेक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे, तर दुसरीकडे भारतातही त्याचा प्रभाव दिसू लागला आहे. आता गाझियाबादच्या हर्ष हॉस्पिटलमध्ये ब्लॅक अँड व्हाईट फंगसचा पहिला रुग्ण समोर आला आहे. कोरोनाच्या नवीन लाटेचा धोका असताना आता या प्रकरणाने आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. ज्या रुग्णामध्ये ब्लॅक अँड व्हाईट फंगस आढळून आला आहे. त्या रुग्णाचं वय 55 वर्षे आहे.
ज्यांना जास्त स्टिरॉइड्स देण्यात आले आहेत अशा कोरोना रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस आढळते, तर ज्या रुग्णांना कोरोना झाला नाही अशा रुग्णांमध्येही व्हाईट फंगसची शक्यता असते. ब्लॅक फंगसचा डोळ्यांवर आणि मेंदूवर सर्वात जास्त परिणाम होतो. तर व्हाईट फंगसचा फुफ्फुस, मूत्रपिंड, आतडे, पोट आणि नखांवर परिणाम होतो. ब्लॅक फंगसमध्ये मृत्यूचे प्रमाण सुमारे 50% आहे.
प्रत्येक दोन व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू होण्याचा धोका आहे. परंतु व्हाईट फंगसमधील मृत्यू दराबाबत अद्याप कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. डॉक्टरांचे म्हणणे आहे की व्हाईट फंगसचा ही एक सामान्य बुरशी आहे जी लोकांना कोरोना महामारीच्या आधीपासून होती. वाराणसीचे विट्रो रेटिना सर्जन डॉ. क्षितिज आदित्य स्पष्ट करतात की, 'हा नवीन आजार नाही. कारण ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती खूप कमी असते, त्यांच्यामध्ये असा आजार होऊ शकतो.
ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस ही फंगसची एक वेगळी प्रजाती आहे, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा रुग्णांनाही होत आहे. ब्लॅक फंगस नाकातून शरीरात प्रवेश करते आणि डोळे आणि मेंदूवर परिणाम करते. डॉ. हनी साल्वा यांनी व्हाईट फंगस जर आपल्या रक्तात किंवा फुफ्फुसात असेल तर ती देखील घातक असते. या रोगाचा उपचार देखील वेगळा आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"