शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

Corona Virus : टेन्शन वाढलं! भारतात सापडला कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट; जाणून घ्या, नव्या लाटेचा कितपत धोका?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 4:27 PM

Corona Virus : गेल्या काही काळापासून जगभरातील कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी त्याचा धोका अद्याप टळलेला नाही.

जगभरात हाहाकार माजवणारा कोरोना अद्याप संपलेला नाही. गेल्या काही काळापासून जगभरातील कोरोना व्हायरसच्या केसेसमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी त्याचा धोका अद्याप टळलेला नाही. अनेक वेळा या व्हायरसच्या विविध प्रकारांमुळे लोकांची चिंता वाढली आहे. याच दरम्यान, याबाबत लोकांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे. चीनमध्ये, जिथे ही महामारी सुरू झाली होती, तिथे आता कोरोनाचा नवीन सबव्हेरिएंट JN.1 ची प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

कोरोनाचे हा नवीन सबव्हेरिएंट सर्वप्रथम लक्जबर्गमध्ये आढळला. त्यानंतर यूके, आइसलँड, फ्रान्स आणि अमेरिकेतही त्याची प्रकरणे दिसू लागली. भारतातच कोरोनाच्या या सबव्हेरिएंटचं एक प्रकरण समोर आलं आहे. केरळमध्ये या नवीन सबव्हेरिएंट JN.1 ची पुष्टी झाली आहे. ही बाब समोर येताच सर्वांच्याच चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 

सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, कोरोनाचे हा सबव्हेरिएंट ओमायक्रॉन सव्हेरिएंट BA.2.86 चे वंशज आहे, ज्याला 'पिरोला' असंही म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते, JN.1 आणि BA.2.86 मध्ये फक्त एकच बदल आहे आणि तो म्हणजे स्पाइक प्रोटीनमधील बदल. स्पाइक प्रोटीन देखील स्पाइक म्हणून ओळखले जातो. हे व्हायरसच्या पृष्ठभागावर लहान स्पाइक्ससारखे दिसते. या कारणास्तव, लोकांमध्ये व्हायरसचा संसर्ग अधिक वेगाने होतो.

JN.1 ची लक्षणं काय आहेत?

सीडीसीच्या मते, कोरोनाच्या या नवीन सबव्हेरिएंटची कोणतीही विशिष्ट लक्षणं अद्याप दिसलेली नाहीत. अशा परिस्थितीत, त्याची लक्षणं कोविड-19 च्या इतर प्रकारांपेक्षा वेगळी आहेत की नाही हे शोधणे कठीण आहे. जर आपण कोरोनाच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, सतत खोकला, पटकन थकवा, नाक वाहणं, अतिसार, डोकेदुखी यांचा समावेश आहे.

नवीन व्हेरिएंट किती धोकादायक?

सध्या, JN.1 बाबत कोणतीही तपशीलवार माहिती समोर आलेली नाही. सीडीसीच्या मते, या प्रकाराची वाढती प्रकरणे पाहता, असं म्हटलं जाऊ शकतं की एकतर तो अधिक संसर्गजन्य आहे किंवा तो आपल्या रोगप्रतिकारक शक्तीपासून सहजपणे सुटू शकतो. सध्या जेएन.1 हा कोरोनाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या व्हेरिएंटपेक्षा जास्त धोकादायक आहे की नाही याचा कोणताही पुरावा नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या