शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

कर्नाटकात आढळला 'मंकीपॉक्स'चा पहिला रुग्ण; काय आहेत 'या' आजाराची लक्षणं? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 14:09 IST

Monkeypox in Karnataka : सुरुवातीची लक्षणे पाहता व्यक्तीची मंकीपॉक्सची टेस्ट करण्यात आली. यामध्ये त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

Monkeypox in Karnataka : कर्नाटकात 'मंकीपॉक्स'चा (Mpox) पहिला रुग्ण आढळला आहे. रिपोर्टनुसार, ही व्यक्ती नुकतीच दुबईहून परतली होती. १७ जानेवारीला दुबईवरून परतल्यानंतर या व्यक्तीच्या शरीरावर पुरळ आणि तापाची लक्षणं जाणवली. त्यानंतर त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सुरुवातीची लक्षणे पाहता व्यक्तीची मंकीपॉक्सची टेस्ट करण्यात आली. यामध्ये त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दरम्यान, यावर्षी राज्यातील हे पहिलेच प्रकरण आहे. आरोग्य अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि लोकांना लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीने (NIV) सुद्धा याची पुष्टी केली आहे. तसेच, या रुग्णाला घेण्यासाठी त्याची पत्नी विमानतळावर गेली होती. त्यामुळे तिचीही टेस्ट करण्यात आली आहे. तसेच, रुग्णाच्या पत्नीलाही वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सदर रुग्ण हा उडुपी जिल्ह्यातील करकला येथील रहिवासी आहे.

दरम्यान, हा व्यक्ती १७ जानेवारीला दुबईहून मंगळुरूला आला होता. यानंतर त्याला अंगावर पुरळ आले आणि ताप आला. त्यानंतर तात्काळ त्याला वैद्यकीय देखरेखीखाली विलगीकरणात ठेवण्यात आले. एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर मंकीपॉक्स फक्त जवळच्या संपर्कातून पसरतो आणि कोरोनापेक्षा कमी धोकादायक आहे. लोकांनी घाबरू नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

या आजाराची लक्षणे काय आहेत?मंकीपॉक्स हा चेचक व्हायरसशी संबंधित आजार आहे. मंकीपॉक्सला Mpox म्हटले जाते. हा आजार दुर्मीळ आहे. परंतु हा एक विषाणूजन्य आजार असून, उंदीर, माकड सारख्या प्राण्यांपासून मानवामध्ये याचा संसर्ग पसरतो. याची सहसा फ्लूसारखी लक्षणे आहेत आणि लिम्फ नोड्सला सूज येऊ शकते. तसेच, हळूहळू चेहऱ्यावर आणि शरीरावर पुरळ उठणे सुरू होते. चिंतेची बाब अशी आहे की, मंकीपॉक्स हा रोग श्वसनाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो.

मंकीपॉक्स कसा पसरतो? १) संक्रमित व्यक्तीच्या जवळ आल्याने. २) एकापेक्षा अधिक पार्टनरशी लैंगिक संबंध ठेवल्याने. ३) डोळे, श्वसनसंस्था, नाक किंवा तोंडातून शरीरात मंकीपॉक्स प्रवेश करू शकतो.४) संक्रमित व्यक्तीने वापरलेला बिछाना, कपडे आणि टॉवेल यांसारख्या वस्तूंना स्पर्श केल्यानेदेखील मंकीपॉक्स पसरू शकतो. ५) माकडे, उंदीर यांसारख्या विषाणू संक्रमित प्राण्यांशी संपर्कात आल्याने. ६) आईपासून गर्भाला संक्रमण. ७) २०२२ मध्ये मंकीपॉक्स विषाणू लैंगिक संपर्काद्वारे अधिक पसरला.

उपाय काय?हा आजार सामान्यत: सौम्य असून, अनेक लोक आराम आणि तापावरील उपचाराशिवाय २ ते ४ आठवड्यांत बरे होतात. मंकीपॉक्सचा प्रसार केवळ संसर्गावर नियंत्रण ठेवूनच नियंत्रित केला जाऊ शकतो. अलगीकरण करणे, वारंवार हात चांगले धुणे. कपडे धुताना हातमोजे घाला. कपडे हवेत हलविल्याने एमपॉक्स हवेत पसरतो. स्मॉलपॉक्स लस ३ दिवसांच्या आत घेतल्यास ती या विषाणूवर ८५ टक्के प्रभावी आहे.

टॅग्स :Healthआरोग्यKarnatakकर्नाटक