नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आपल्या पुढील आणि महत्त्वाच्या प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. हे मिशन LVM3 M2/OneWeb India1 आहे. हे मिशन इस्रो आपले रॉकेट 'LVM-3' म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 मधून 22 तारखेच्या मध्यरात्री आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून मध्यरात्री 12:7 वाजता प्रक्षेपित करेल. दरम्यान, LVM-3 पूर्वी GSLV मार्क रॉकेट म्हणूनही ओळखले जात होते.
या मिशनचे 24 तासांचे काउंटडाउन आज रात्री 12.07 वाजता सुरू होईल. या मिशनमध्ये ब्रिटिश स्टार्टअप वनवेबचे 36 उपग्रह प्रक्षेपित केले जातील. वनवेब ही एक खाजगी सॅटेलाइट कम्युनिकेशन कंपनी आहे. भारतीय कंपनी भारती इंटरप्राइजेस ही वनवेबमधील प्रमुख गुंतवणूकदार आणि भागधारक आहे. या प्रक्षेपणासह, इस्रो जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण सेवा बाजारपेठेत प्रवेश करणार आहे.
अंतराळ विभागाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली सेंट्रल पब्लिक सेक्टर इंटरप्राइजेस, एनएसआयएल (New Space India Ltd) ने लंडन स्थित वनवेबसोबत दोन LVM 3 द्वारे LEO (Low Earth Orbit) उपग्रहांच्या प्रक्षेपण सेवेसाठी करार केला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या अंतराळ विभागाच्या अंतर्गत इस्त्रोचे व्यावसायिक काम करणारी एनएसआयएलसोबत हे पहिले व्यावसायिक LVM3 प्रक्षेपण असणार आहे. या प्रक्षेपण 36 उपग्रहांचा दुसरा संच पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रक्षेपित केला जाईल.
इस्त्रोसाठी महत्त्वाचे मिशनहे मिशन एनएसआयएल आणि इस्त्रो या दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण लाँच व्हेईकल मार्क 3 (GSLV मार्क 3) द्वारे व्यावसायिक प्रक्षेपण करण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी इस्रोने व्यावसायिक प्रक्षेपणासाठी पीएसएलव्हीचा वापर केला होता. लाँच व्हेईकल मार्क 3 हे इस्रोचे 640 वजनाचे सर्वात वजनदार रॉकेट आहे, जे जवळपास 4 टन वजनाचा पेलोड जिओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये आणि 8 टन पेलोड लो अर्थ ऑर्बिटमध्ये वाहून नेण्यास सक्षम आहे.
लाँच व्हेईकल तीन स्टेजचे रॉकेटहे तीन-स्टेजचे रॉकेट आहे, ज्यामध्ये दोन सॉलिड मोटर स्टेप्स आहेत आणि एक लिक्विड प्रोपोलेंट कर स्टेज आणि मध्यभागी एक क्रायोजेनिक स्टेज आहे. या वजनामुळे त्याला इस्रोचे बाहुबली असेही म्हणतात. दरम्यान, जिथे आतापर्यंत पीएसएलव्हीच्या माध्यमातून व्यावसायिक प्रक्षेपण पूर्ण झाले होते, तिथे या बाहुबलीच्या व्यावसायिक बाजारपेठेत प्रवेश केल्याने, इस्रो आणि एनएसआयएलसाठी नवीन प्लॅटफॉर्म खुला होईल.