शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

अधिवेशनाचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ तणावात

By admin | Published: February 24, 2016 2:47 AM

संसदेच्या बजेट सत्राचा मंगळवारी होता फर्स्ट डे फर्स्ट शो. खासदारांच्या उपस्थितीने तुडुंब भरलेल्या सेंट्रल हॉलमधे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली.

- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीसंसदेच्या बजेट सत्राचा मंगळवारी होता फर्स्ट डे फर्स्ट शो. खासदारांच्या उपस्थितीने तुडुंब भरलेल्या सेंट्रल हॉलमधे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली. सव्वा तासांच्या प्रदीर्घ अभिभाषणात राष्ट्रपतींनी सरकारच्या जन धन योजनेपासून, २0२२ पर्यंत सर्वांना घरकुले, २0१८ पर्यंत प्रत्येक गावात वीज, वन रँक वन पेन्शन, महत्वाकांक्षी पीक विमा योजनेसह ठळक योजनांचा विस्ताराने आढावा घेतला. अभिभाषणात जुन्याच घोषणांची उजळणी अधिक होती. फारसे नवे मुद्दे नव्हते. अभिभाषणात महत्वाकांक्षी योजनांचा उल्लेख होत असताना सत्ताधारी सदस्य बाके वाजवून स्वागत करीत होते. लोकसभा टीव्ही कॅमेऱ्याचा फोकस अशा वेळी संबंधित मंत्र्यांच्या दिशेने वळत असे. आपले चेहरे हसरे ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न यावेळी अनेक केंद्रीय मंत्री करीत होते. यंदाचे बजेट अधिवेशन वादळी ठरणार याविषयी कोणालाही शंका नाही. जेएनयू प्रकरण, रोहित वेमुलाची आत्महत्या, जाटांचे आरक्षण आंदोलन अशा कारणांमुळे संसदेबाहेर तणावाचे वातावरण आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवीत सोनिया गांधी म्हणाल्या की, सत्ताधारी पक्षाचे भान पूर्णत: हरवले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)मोदींच्या चेहऱ्यावर तणाव..1) संसदेच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विरोधी पक्षांच्या सकारात्मक भूमिकेचा प्रथमच हवाला देत, जनतेच्या आकांक्षा आणि अपेक्षांनुसार बजेट सत्रात उभय सभागृहांचा वापर गहन चर्चा व विचार विनिमयासाठीच होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. 2) बोलतांना मोदींंच्या चेहऱ्यावर नेहमीचा उत्साही नूर अथवा आत्मविश्वास मात्र दिसला नाही. 3) संसदेत गदारोळ होण्यासाठी अनेक विषय सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनीच यंदाही पुरवले आहेत. त्याचा स्पष्ट तणाव पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर सकाळपासून जाणवत होता.