शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोरोनाच्या महासाथीनंतर H3N2 चं संकट, कर्नाटकात पहिल्या मृत्यूची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 11:31 AM

राज्याचे आरोग्य विभागाचे आयुक्त रणदीप यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

H3N2 Virus : H3N2 (इन्फ्लुएंझा व्हायरस) विषाणूमुळे मृत्यूची पहिली घटना कर्नाटकमध्ये नोंदवली गेली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील हासन जिल्ह्यात H3N2 विषाणूमुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्य विभागाचे आयुक्त रणदीप यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ताप, सर्दी आणि घशाच्या समस्येनं त्रस्त असलेल्या ८५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. टीव्ही ९ नं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये H3N2 विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात ५० हून अधिक रुग्णांची नोंदही करण्यात आली आहे. यामध्ये हासनमधील सहा जणांना H3N2 विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. दरम्यान, आरोग्य विभागानं ६० वर्षांवरील लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी पावलं उचलली आहेत. त्याचबरोबर या पहिल्या मृत्यूची चौकशी करण्याबाबत आयुक्त रणदीप यांनी सांगितलं आहे.

१ मार्चला व्यक्तीचा मृत्यूहासन जिल्ह्यातील अलूर येथे १ मार्च रोजी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यांना खोकला, घसादुखी आदी त्रास होत होता. आता खबरदारीचा उपाय म्हणून मृत व्यक्तीच्या संपर्कातील लोक आणि गावातील व्यक्तींची तपासणी केली जात आहे. सर्वांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली असून घशातील स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ. शिवस्वामी यांनी दिली आहे.

कोरोनाच्या महासाथीनंतर आता H3N2 व्हायरसनं चिंता वाढवली आहे. आधीच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये H3N2 विषाणूच्या संसर्गात वाढ झाली आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर राज्य सरकारने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.

टॅग्स :Karnatakकर्नाटकHealthआरोग्य