शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

पहिली, दुसरीतील मुलांना गृहपाठ देऊ नका, ती वेटलिफ्टर नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 4:47 AM

सीबीएसई शाळांतील पहिल्या व दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नये, असा आदेश

चेन्नई : सीबीएसई शाळांतील पहिल्या व दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येऊ नये, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला दिला. ही लहान मुले म्हणजे वेटलिफ्टर नाहीत. त्यामुळे त्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात यावे, असा आदेश राज्य सरकारांना द्यावा अशा शब्दांत न्यायालयाने केंद्राला सुनावले आहे.एखाद्या मुलाच्या वजनाच्या १० टक्के इतकेच त्याच्या दप्तराचे वजन असायला हवे याबाबत राज्य सरकारांनी कटाक्ष ठेवावा व त्यावर केंद्राने बारीक लक्ष ठेवावे असे सांगून न्यायालयाने म्हटले आहे की, नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्चने (एनसीआरटी) तयार केलेली पुस्तकेच सीबीएससी शाळांत वापरणे बंधनकारक करायला हवे. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन किती असावे याबाबत तेलंगणा व महाराष्ट्र सरकारने आदेश जारी केले आहेत. त्याचा उल्लेख करुन मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन. किरुबाकरन यांनी म्हटले आहे की, दप्तराच्या वजनासंदर्भातील धोरण ठरविण्याचा आदेश केंद्राने राज्य सरकारे व केंद्रशासित प्रदेशांना द्यावा.एम. पुरुषोत्तम या वकिलाने केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा आदेशदिला. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाचे सचिव व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, दुसºया इयत्तेपर्यंतच्या मुलांना गृहपाठ देण्यात येऊ नये व तिसºया इयत्तेतील मुलांना आठवड्यातून दोन तासासाठी गृहपाठ देण्यात यावा असे धोरण आहे.पाच ते सहा वर्षे वयाच्या मुलांनाहवी असते अकरा तासांची झोपअंतरिम आदेश देताना न्यायालयाने म्हटले आहे की, वरच्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या गृहपाठामुळे त्यांची आकलनशक्ती नक्कीच वाढते.परंतु अगदी लहान वयाचे विद्यार्थी अभ्यासावर नीट लक्ष केंद्रित करु शकत नाहीत, त्यांना इतरांनी दिलेल्या सूचनांचे पालन चटकन करता येत नाही तसेच सगळ््या गोष्टी नीट लक्षात राहतील अशीही त्यांची मानसिक जडणघडण झालेली नसते असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.पाच ते सहा वर्षे वयाच्या मुलांना दिवसभरातकिमान ११ तासाची झोप आवश्यक असते. जर ही मुले सकाळी लवकर शाळेत जात असतील तर त्यांनी रात्री लवकर झोपणे आवश्यक आहे. त्यामुळेच पहिल्या व दुसºया इयत्तेतील मुलांना गृहपाठ देण्यास एनसीआरटीने केलेली मनाई योग्यच आहे.