मुंबई : फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांचा आज जन्मदिवस. के. एम. करिअप्पा यांनी 15 जानेवारी 1949 साली तत्कालीन ब्रिटिश जनरल सर रॉय बुचर यांच्याकडून लष्काराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून सूत्रे स्वीकारली होती. तेव्हापासून 15 जानेवारी हा लष्कर दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
के.एम. करिअप्पा यांचा जन्म 28 जानेवारी 1899 साली कर्नाटकात झाला. 1947 मध्ये युनाइटेड किंगडमच्या इंपिरियल डिफेंस कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी जाणारे ते पहिले भारतीय ठरले. 1953 मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यानंतर के. एम. करिअप्पा यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले. 1956 पर्यंत त्यांनी उच्चायुक्त म्हणून पदावर सांभाळला होता.
अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती हॅरी ट्रूमैन यांनी 'Order of the Chief Commander of the Legion of Merit' ने के. एम. करिअप्पा यांना सम्मानित केले होते. याचबरोबर, 1983 मध्ये के. एम. करिअप्पा यांना भारतीय लष्करातील फील्ड मार्शल हा सन्मान देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्याशिवाय सॅम माणेकशॉ यांना देखील हा सन्मान देण्यात आला होता.
1993 साली के. एम करिअप्पा यांचे बंगळुरूमध्ये निधन झाले.