नवी दिल्ली : अणु इंधनावर चालणारी आणि अण्वस्त्रधारी अशी भारतात बांधलेली पहिली पाणबुडी ‘आयएनएस अरिहंत’ नौदलात कामगिरीसाठी सज्ज झाली आहे. सर्व कठोर चाचण्या ‘आयएनएस अरिहंत’ने अलीकडेच यशस्वीपणे पूर्ण केल्या असून नौदलात दाखल करण्याबाबत सरकारी पातळीवरील निर्णय होताच ती नौदल ताफ्यात सामील होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. विशाखापट्टणम येथील नौदल जहाजबांधणी गोदीत ‘आयएनएस अरिहंत’ची बांधणी केली गेली व गेल्या पाच महिन्यांपासून रशियाच्या मदतीने तेथेच तिच्या खोल सागरी सफरीच्या चाचण्या सुरू होत्या. ‘एसएसबीएन’ या तांत्रिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘अरिहंत’च्या वर्गातील एकूण पाच आण्विक पाणबुड्या बांधण्याची भारताची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सध्या भारतीय नौदलात ‘अकुला’ वर्गातील ‘आयएनएस चक्र’ ही एकमेव आण्विक पाणबुडी कार्यरत आहे. ती रशियाकडून काही काळासाठी भाड्याने घेण्यात आली आहे. म्हणूनच ‘आयएनएस अरिहंत’ ही नौदलात दाखल होणारी भारतीय बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी असेल. याच वर्गातील आणखी दोन पाणबुड्यांचे काम सध्या विशाखापट्टणम येथे सुरू आहे. या पाणबुड्या ‘अरिहंत’हून अधिक मोठ्या व अत्याधुनिक असतील. तसेच भविष्यात नौदलात दाखल होणाऱ्या सर्व आण्विक युद्धनौका व पाणबुड्यांसाठी पूर्व किनाऱ्यावर काकिनाडाजवळ ‘आयएनएस वर्षा’ हा नवा सामरिक तळ उभारण्याचे कामही वेगाने प्रगतिपथावर आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)६,००० टन वजनी ‘अरिहंत’ची बलस्थानेआखूड पल्ल्याची के-१५ अथवा बीओ-५ क्षेपणास्त्रे तैनात आहेत. मारक क्षमता ७०० कि.मी.हून अधिक.के-४ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे. मारकक्षमता ३५०० कि.मी.पर्यंत.पाण्याच्या आतून आणि पृष्ठभागावरून अण्वस्त्रांचा मारा करण्याची क्षमता.पाण्यात असताना एखाद्या विमानालाही लक्ष्य करू शकते.एकूण वजन ६,००० टन.प्रकल्पावर एक नजर१९७०-प्रकल्पाला मंजुरी मिळाली१९८४- डिझाईन आणि तंत्रज्ञानाला अंतिम स्वरूप देण्यात आले, प्रकल्प तयार१९९८- खासगी क्षेत्राच्या मदतीने प्रकल्पावर काम सुरू२००९-अरिहंतबद्दल प्रथमच माहिती देण्यात आली२०१३- अंतिम चाचणी सुरू२०१६-सर्व चाचण्या यशस्वी
पहिली देशी आण्विक पाणबुडी सज्ज
By admin | Published: February 24, 2016 2:52 AM