उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक हृदयद्राक घटना घडली आहे. एका व्यक्तीने लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये पार्टी आयोजित केली होती. यासाठी त्यांनी आपल्या सर्व नातेवाईकांना बोलावले होते. पत्नीच्या मोठ्या बहिणीचे कुटुंबही आले. याच दरम्यान, नाचत असताना बहिणीच्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
लग्नाप्रमाणे सजवलेल्या स्टेजवर पती-पत्नी बसले होते. तसेच नातेवाईक फिल्मी गाण्यांच्या तालावर नाचत होते. काही वेळाने पती-पत्नीही नातेवाईकांसोबत नाचू लागले. मोठ्या बहिणीचा पती अमरदीप प्रयागराज (40 वर्षे) हा डान्स करताना खाली पडला. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घाईघाईने त्याला रुग्णालयात नेले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
रुग्णालयातील डॉक्टरांनी अमरदीप यांना मृत घोषित केले. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले नैनी येथील रहिवासी सुनील वर्मा यांनी सांगितले की, कार्यक्रमाचे वातावरण अतिशय प्रसन्न होते. डान्स करताना अचानक अमरदीप खाली पडला. यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अमरदीप सीतापूर हॉस्पिटल कॅम्पस, क्लाइव्ह रोड, सिव्हिल लाईन्स येथील रहिवासी होते. त्यांना दोन मुले आहेत. ते औषध पुरवठ्याचे काम करत असल्याचे सांगितले. मृताची आई सीतापूर येथील रुग्णालयात काम करते. अमरदीप एकदा थकून खाली बसल्याचे कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही लोकांनी सांगितले. यानंतर, तब्येत बरी झाल्यावर त्याने पुन्हा नाचायला सुरुवात केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"