नवी दिल्ली : सहा जणांना ठार मारल्याबद्दल फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळला. राष्ट्रपती कोविंद यांच्यासमोर दयेसाठी आलेला हा पहिला अर्ज होता.जगत राय याने आपली म्हैस चोरल्याची तक्रार बिहारमध्ये राहणारे विजेंद्र महोता यांनी पोलिसांत दिली होती. ती तक्रार मागे घ्यावी, अशी मागणी जगतने केली. मात्र, विजेंद्र यांनी तक्रार मागे घेतली नाही. त्या रागातून जगतने २००६ साली विजेंद्रचे कुटुंबच संपवून टाकले. जगतने विजेंद्र यांची पत्नी आणि त्यांची ५ अपत्ये असे ६ जण झोपेत असताना त्यांचे घर पेटवून दिले होते. त्यात सर्व जणांचा मृत्यू झाला होता.विजेंद्र यांचाही त्यात भाजून मृत्यू झाला होता. या कृत्याबद्दल जगतला पाच वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा रद्द करावी, म्हणून जगतने राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला होता.
राष्ट्रपती कोविंद यांनी फेटाळला पहिला दयेचा अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 4:56 AM