शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

योगी सरकारमधून पहिल्या मंत्र्याचा राजीनामा, गंभीर आरोप; थेट अमित शहांकडे पाठविला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 1:43 PM

UP Minister resigned: दलित असल्याने अधिकाऱ्यांकडून योग्य मान सन्मान मिळत नसल्याचा गंभीर आरोप खटीक यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजभवनाला देखील राजीनाम्याची प्रत पाठविल्याचे सांगितले जात आहे.

योगी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मोठी अस्वस्थता असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. तीन मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. यावर पहिल्या मंत्र्याचा राजीनामा आला आहे. जलसंपदा मंत्री दिनेश खटीक यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनाच राजीनामा पाठविल्याने युपीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

दलित असल्याने अधिकाऱ्यांकडून योग्य मान सन्मान मिळत नसल्याचा गंभीर आरोप खटीक यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजभवनाला देखील राजीनाम्याची प्रत पाठविल्याचे सांगितले जात आहे. खटीक हे जलसंपदा खात्याचे राज्यमंत्री आहेत. 

मंत्री असून देखील आपल्याला बैठकांचे निमंत्रण दिले जात नाही. तसेच आपल्यासोबत बैठकाही घेतल्या जात नाहीत. फक्त गाडी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप खटीक यांनी केला आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती मागविली तर ती देखील देण्यात आलेली नाही. मुख्य सचिवांनी तर फोनही कट केला. नमामी गंगे योजनेमध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खटीक यांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्रात आतापर्यंत राज्यमंत्री म्हणून कोणतेच काम मिळाले नसल्याची तक्रार केली आहे. मी दिलेल्या कोणत्याही आदेशावर कार्यवाही करण्यात आलेली नाही, तसेच विभागाच्या योजनांची माहिती देखील देण्यात येत नाही, असे आरोप केले आहेत. पक्षाकडून अद्याप खटीक यांच्या राजीनाम्याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. तसेच राजीनामा देखील स्वीकारण्यात आलेला नाही.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशAmit Shahअमित शाह