शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पहिला 'ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार' जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 6:37 PM

Rahul Gandhi: खासदार शशी थरुर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने राहुल गांधींची निवड केली.

Rahul Gandhi News:काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पहिला 'ओमन चंडी सार्वजनिक सेवक पुरस्कार' जाहीर झाला आहे. हा पुरस्कार केरळचे माजी मुख्यमंत्री दिवंगत ओमन चंडी यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आला असून, राहुल गांधी याचे पहिले मानकरी ठरले आहेत. ‘ओमन चंडी फाऊंडेशन’ ने आज(दि.21) ओमन चंडी यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या तीन दिवसांनंतर या पुरस्काराची घोषणा केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुरस्कार विजेत्याला एक लाख रुपये आणि प्रसिद्ध कलाकार आणि चित्रपट निर्माते नेमम पुष्पराज यांनी बनवलेली मूर्ती दिली जाईल. फाउंडेशनने एका निवेदनात म्हटले की, राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते आहेत आणि त्यांनी 'भारत जोडो यात्रे'द्वारे लोकांच्या समस्या जाणून त्यावर उपाय शोधले. दरम्यान, पुरस्कार विजेत्या राहुल गांधींची निवड काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ ज्युरीने केली आहे.

कोण आहेत ओमन चंडी?केरळचे 10 वे मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे गेल्या वर्षी (18 जुलै 2023) बंगळुरुच्या चिन्मय मिशन रुग्णालयात निधन झाले. 2004-2006 आणि 2011-2016 दरम्यान ओमन चंडी केरळचे मुख्यमंत्री होते. यासोबतच ते 2006 ते 2021 दरम्यान केरळमध्ये विरोधी पक्षनेतेही होते. राज्यातील सर्वाधिक काळ आमदार राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. याशिवाय ओमन चंडी हे एकमेव भारतीय मुख्यमंत्री आहेत, ज्यांना संयुक्त राष्ट्राने सार्वजनिक सेवेसाठी सन्मानित केले होते.

2018 मध्ये AICC सरचिटणीस बनलेराहुल गांधी यांनी 6 जून 2018 रोजी ओमन चंडी यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बनवले होते. याशिवाय त्यांना आंध्र प्रदेशचे प्रभारीही करण्यात आले. मात्र, त्यांच्या शेवटच्या काळात चंडी काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य राहिले. चंडी यांचा राजकारणातील प्रवास खूप मोठा होता. चंडी 1967-69 पर्यंत केरळ विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष होते. यासोबतच त्यांची 1970 मध्ये युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. पुथुपल्ली विधानसभा मतदारसंघातून ते 5 दशके आमदार म्हणून निवडून आले होते.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसKeralaकेरळShashi Tharoorशशी थरूर