झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार; 30 नोव्हेंबरला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 12:17 PM2019-11-28T12:17:41+5:302019-11-28T12:18:26+5:30
क्षाकडून तिकिट न मिळाल्याने बंडखोरी केलेल्या उमेदवारांचेही यामध्ये नाव आहे.
रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज थंडावणार आहे. 30 नोव्हेंबरला 13 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान घेतले जाणार आहे.
या 13 जागांवर एकूण 189 उमेदवार निवडणूक लञवत असून यामध्ये 15 महिला आहेत. या जागांवर एक माजी केंद्रीय मंत्री, एक मंत्री, नऊ माजी मंत्री, दहा विद्यामान आमदार आणि एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढवत आहेत.
पक्षाकडून तिकिट न मिळाल्याने बंडखोरी केलेल्या उमेदवारांचेही यामध्ये नाव आहे. राधाकृष्ण किशोर, वैद्यनाथ राम, अनंत प्रताप देव आदीं उभे राहिले आहेत. तर भाजपाने 12 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर हुसैनाबादमध्ये अपक्षाला पाठिंबा दिला आहे. तर महाआघाडीमध्ये सहा, झामुमोचे चार आणि राजदचे तीन उमेदवार लढत आहेत. तर झारखंड विकास मोर्चाने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत.