India's first pod taxi: भारतातील पहिली पॉड टॅक्सी 'या' शहरात धावणार; सरकारने केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 04:37 PM2023-02-16T16:37:28+5:302023-02-16T16:38:17+5:30

पॉड टॅक्सीचा मार्गही ठरला, आता पुढचा टप्पा निविदांचा

first pod taxi of India will run in Haridwar city of Uttarakhand Pushkar Singh Dhami Government announced | India's first pod taxi: भारतातील पहिली पॉड टॅक्सी 'या' शहरात धावणार; सरकारने केली घोषणा

India's first pod taxi: भारतातील पहिली पॉड टॅक्सी 'या' शहरात धावणार; सरकारने केली घोषणा

googlenewsNext

India's first pod taxi: उत्तराखंड सरकारच्या धामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेत सरकारने हरिद्वार जिल्ह्याला नवी भेट दिली आहे. धामी मंत्रिमंडळाने हरिद्वारमधील २०.७४ किलोमीटर लांबीच्या ट्रॅकवर वैयक्तिक रॅपिड ट्रान्झिट सिस्टम अंतर्गत पॉड टॅक्सी चालवण्यास मान्यता दिली आहे. हरिद्वार पॉड टॅक्सी प्रकल्प PPP मोडवर तयार केला जाईल.

कॅबिनेटमध्ये झाला महत्त्वाचा निर्णय

हरिद्वारला कुंभनगरी असेही म्हणतात. त्यामुळे येथील वाहतुकीची आधुनिक साधने विकसित करण्यासाठी उत्तराखंड मेट्रो कॉर्पोरेशनने येथे पॉड टॅक्सी चालवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हरिद्वारमधील ज्वालापूरच्या टोकापासून भारत माता मंदिर आणि दक्ष प्रजापती मंदिरापासून लक्‍सर रोडपर्यंत एकूण ४ कॉरिडॉर बनवले जाणार आहेत. या कॉरिडॉरमध्ये 20.4 किलोमीटर लांबीचा ट्रॅक असेल आणि येथे पॉड टॅक्सी चालवल्या जातील.

सविस्तर प्रकल्प अहवाल तयार

यासाठी उत्तराखंड मेट्रो कॉर्पोरेशनने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर यासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. या मार्गावरील प्रमुख स्थानकांमध्ये सीतापूर, ज्वालापूर, आर्य नगर, रामनगर, रेल्वे स्टेशन, हरकी पौडी, खडखडी, मोतीचूर, शांतीकुंज, भारत माता मंदिर, गणेशपुरा मंदिर, जगजीतपूर आणि लक्सर यांचा समावेश आहे. हा प्रकल्प दीड वर्षात पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पात भूसंपादनाची फारशी गरज भासणार नाही.

इतर शहरांमध्येही लवकरच उपलब्ध होऊ शकतो नवा पर्याय

भारतातील पॉड टॅक्सीचा हा पहिला वापर असेल. या प्रकल्पाच्या यशावर अनेक गोष्टी अवलंबून असल्याचे उत्तराखंड सरकारचे अधिकारी सांगतात. त्याच वेळी, त्याचे यश देशातील उर्वरित शहरांसाठी एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून काम करेल आणि नव्या संकल्पना भारतभर रावबण्यास मदत होईल असेही सांगितले जात आहे.

Web Title: first pod taxi of India will run in Haridwar city of Uttarakhand Pushkar Singh Dhami Government announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.