शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

दसऱ्याच्या सुमुहूर्तावर मिळणार पहिले ‘राफेल’ विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 05:02 IST

मंगळवारी पहिले ‘राफेल’ विमान औपचारिकपणे दिले जाणार असले, तरी पहिल्या चार विमानांची तुकडी भारतात यायला मे महिना उजाडेल.

नवी दिल्ली : भारतीय उपखंडातील सामरिक क्षमतेची समीकरणे बदलून भारताचे पारडे जड करणारे पहिले ‘राफेल’ विमान स्वीकारण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग स्वत: फ्रान्सला जाणार असून, त्यानंतर ते तेथे भारतीय परंपरेनुसार शस्त्रपूजनही करणार आहेत.

फ्रान्सकडून घ्यायच्या एकूण ३६ ‘राफेल’ विमानांपैकी पहिले विमान भारताकडे सुपुर्द करण्यासाठी येत्या मंगळवारचा दसरा आणि भारतीय हवाईदलाचा ८७वा वर्धापन दिन असा दुहेरी मुहूर्त निवडण्यात आला आहे. त्यानिमित्त राजनाथ सिंग सोमवारपासून तीन दिवस फ्रान्सच्या दौºयावर जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंग गेली अनेक वर्षे दसºयाच्या दिवशी न चुकता शस्त्रपूजन करण्याची परंपरा पाळत आले आहेत. गेल्या सरकारमध्ये गृहमंत्री असतानाही त्यांनी असे शस्त्रपूजन केले होते. तीच परंपरा कायम ठेवून पहिले ‘राफेल’ स्वीकारल्यानंतर यंदाचे शस्त्रपूजन ते फ्रान्समध्ये करतील.

पहिले ‘राफेल’ भारताकडे सुपुर्द करण्याचा औपचारिक समारंभ पॅरिसपासून सुमारे ५९० किमी अंतरावर असलेल्या बॉर्डेक्स या बंदराच्या शहरात असलेल्या दस्साँ एव्हिएशन कंपनीच्या कारखान्यात होणार आहे. हा समारंभ झाल्यानंतर तेथेच राजनाथ सिंग शस्त्रपूजन करतील व नंतर ‘राफेल’ विमानातून एक फेरफटकाही मारतील, असे संरक्षण मंत्रालयाचे मुख्य प्रवक्ते भारत भूषण बाबू यांनी सांगितले. फ्रान्सच्या सशस्त्र सैन्यदलांच्या मंत्री फ्लॉरेन्स पार्ले याही यावेळ आवर्जून उपस्थित असतील.मंगळवारी पहिले ‘राफेल’ विमान औपचारिकपणे दिले जाणार असले, तरी पहिल्या चार विमानांची तुकडी भारतात यायला मे महिना उजाडेल. पुढील दोन वर्षांत सर्व विमाने मिळाल्यानंतर, त्यांच्या दोन स्वतंत्र स्वाड्रन स्थापन करून त्या पंजाबमध्ये अंबाला तर प. बंगालमधील हाशिमारा येथे तैनात केल्या जातील.‘मिटिआॅर’, ‘स्कॅल्प’मुळे शत्रूला भरेल धडकी ‘राफेल’ लढाऊ विमाने ‘मिटिआॅर’ आणि ‘स्कॅल्प’ या त्यांच्या श्रेणीतील जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्रांनी सज्ज असतील. त्यामुळे भारतीय हवाई दलास त्यामुळे शत्रूला धडकी भरेल अशी न भूतो मारकशक्ती प्राप्त होणार आहे.

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRajnath Singhराजनाथ सिंह