हरियाणामधून पहिला निकाल आला; भाजपाच्या वादळातही काँग्रेस उमेदवार ४६ हजार मतांनी जिंकला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 01:22 PM2024-10-08T13:22:10+5:302024-10-08T13:22:30+5:30
Nuh Election Result : नूह हा राज्याचा मागास जिल्हा आहे. परंतू मतदानाच्या बाबतीत राज्यात पाचव्या क्रमांकाचे मतदान झालेले आहे. या जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांत ७२.८१ टक्के सरासरी मतदान झाले होते.
हरियाणामधून पहिला निकाल हाती आला आहे. सुरुवातीला काँग्रेसच्या बाजुने झुकलेले जनमत अचानक भाजपाच्या बाजुला आले आणि या वादळात पुन्हा एकदा काँग्रेसचे पानिपत झाले आहे. या वादळात पहिला निकाल येत असून काँग्रेसचे नूह मतदारसंघाचे उमेदवार आफताब अहमद हे ४६८७१ मतांनी जिंकले आहेत.
अहमद यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी असून त्यांनी इनेलोचे उमेदवार ताहिर हुसेन यांचा दारुण पराभव केला आहे. भाजपाच्या उमेदवाराला तिसऱ्या नंबरवर समाधान मानावे लागले आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार आफताब अहमद यांना एकूण ९१६९७ मते मिळाली आहेत. तर हुसेन यांना ४४८२६ आणि भाजपाच्या संजय सिंह यांना १५८१० मते मिळाली आहेत.
नूह हा राज्याचा मागास जिल्हा आहे. परंतू मतदानाच्या बाबतीत राज्यात पाचव्या क्रमांकाचे मतदान झालेले आहे. या जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांत ७२.८१ टक्के सरासरी मतदान झाले होते.
विनेश फोगाटही आघाडीवर...
दुसरीकडे विनेश फोगाटही ११ व्या फेरीअखेर सहा हजार मतांनी आघाडीवर आहे. विनेश फोगाट या सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर होत्या. परंतू, नंतर त्या पिछाडीवर पडल्या होत्या. आता पुन्हा त्यांनी ६ हजार मतांनी आघाडी घेतली असून त्या मदमोजणी केंद्रावर दाखल झाल्या आहेत. भाजपचे उमेदवार योगेश बैरागी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.